​वरूण धवन काही दिवसांसाठी ट्विटरवरून असेल गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 13:05 IST2017-04-06T07:35:52+5:302017-04-06T13:05:52+5:30

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याला ट्विटरवर फॉलो करणा-यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, काही दिवस वरूण ट्विटरवर दिसणार नाही. ...

Varun Dhawan will be on Twitter for a few days! | ​वरूण धवन काही दिवसांसाठी ट्विटरवरून असेल गायब!

​वरूण धवन काही दिवसांसाठी ट्विटरवरून असेल गायब!

लिवूड अभिनेता वरूण धवन याला ट्विटरवर फॉलो करणा-यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, काही दिवस वरूण ट्विटरवर दिसणार नाही. मी पुढचे काही दिवस ट्विटरवर नसेल, असे वरूणने जाहिर केले आहे. गत ३ एप्रिलला वरूण ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह दिसला. या तारखेला त्याने शेवटचे ट्विट केलेय.
३ एप्रिलला ‘मैं तेरा हिरो’ या सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो शेअर करत, ‘मैं तेरा हिरो’ ला तीन वर्षे पूर्ण झालीत. या सिनेमाने माझं आयुष्य बदलले, असे तो म्हणाला होता. यानंतर वरूण ट्विटरवर दिसलाच नाही. मग अचानक त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट दिसली. ‘येथून पुढचे काही दिवस मी ट्विटरवर नसेल. अर्थात मी कायमचे ट्विटर बंद करत नाहीयं. मी लवकरच परत येईल’, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. यामागचे कारण मात्र त्याने स्पष्ट केले नाही. त्यामुळे वरूणने ट्विटरवरून अचानक अशी एक्झिट का घेतली, हे कळायला मार्ग नाही. हे कारण लवकरच कळेल, अशी अपेक्षा आपण करूयात.
 

ALSO READ : वरुण धवनने केले मुलींच्या ‘पिरियड्स’ विषयी ट्विट

तूर्तास वरूण ‘जुडवा2’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिसणार आहे, ती श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस शिवाय तापसी पन्नू. येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  लवकरच वरूण शूजीत सरकारच्या चित्रपटात दिसणार असल्याचीही चर्चा आहे. हा एक डार्क चित्रपट आहे. अलीकडे वरूणचा ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ हा चित्रपट येऊन गेला. बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाने १०० कोटींपर्यंतचा पल्ला गाठला. आता ‘जुडवा2’ बॉक्सआॅफिसवर कशी धम्माल करतो? शिवाय वरूण ट्विटरवर कधी परततो? हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Web Title: Varun Dhawan will be on Twitter for a few days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.