वरुण धवन दिसणार शूजीत सरकारच्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 12:23 IST2017-02-28T06:53:09+5:302017-02-28T12:23:09+5:30

आजकाल ब्रदिनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेले वरुण धवन पु़ढचा चित्रपट शूजीत सरकारबरोबर करत असल्याचे त्यांने सांगितले ...

Varun Dhawan will appear in Shuijit Government's film | वरुण धवन दिसणार शूजीत सरकारच्या चित्रपटात

वरुण धवन दिसणार शूजीत सरकारच्या चित्रपटात

काल ब्रदिनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेले वरुण धवन पु़ढचा चित्रपट शूजीत सरकारबरोबर करत असल्याचे त्यांने सांगितले आहे. याचित्रपटाबाबत त्यांने ज्यात माहिती दिली नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून कानावर येत होते की वरुण धवन आणि शूजीत सरकारमध्ये एका चित्रपटाला घेऊन चर्चा चालू आहे. एका इव्हेंटमध्ये वरुण धवनला याबाबात विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले इमानदारीने सांगतो आता मी याठिकाणी ब्रदिनाथ की दुल्हनियाच्या प्रमोशनसाठी आलो आहे. त्यामुळे मी याबाबत काहीही बोलणार नाही आता
एवढ मात्र नक्कीच सांगेन तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे. सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार हा एका डार्क चित्रपट आहे. ज्याची कथा जूही चतुर्वेदी सध्या लिहिते आहे. जिने याआधी पीकू आणि विकी डोनर सारखे चित्रपटांसाठी लेखन केले आहे. 

वरुणने आता पर्यंत केलेले चित्रपट हे एक तर रोमाँटिक किंवा कॉमेडी होते. ज्यांना प्रेक्षकांची हि पसंती मिळाली होती. बदलापुरमध्ये त्यांने आपल्या अभिनयाची एक वेगळी शेड दाखवली होती. सध्या वरुण धवन ब्रदिनाथ कि दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात तो आपल्याला ब्रदिनाथच्या भूमिकेत दिसणार आहे आलिया भट्ट आणि वरुण धवनची हा एका रोमाँटिक चित्रपट आहे. 10 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. हा चित्रपट आलिया आणि वरुणच्या हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाला घेऊन आलिया आणि वरुण दोघेही ही खूप उत्साही दिसतायेत. या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला प्रेक्षक ही उत्सुक असतील .     

Web Title: Varun Dhawan will appear in Shuijit Government's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.