रेमो डिसूझा चित्रपटात काम करण्यासाठी वरुण धवनला मिळाली 32 कोटींची ऑफर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 12:33 IST2018-04-19T06:46:36+5:302018-04-19T12:33:34+5:30
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा रिलीज झालेला अक्टूबर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच पसंती मिळते आहे. सध्या तो चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय ...

रेमो डिसूझा चित्रपटात काम करण्यासाठी वरुण धवनला मिळाली 32 कोटींची ऑफर ?
ब लिवूड अभिनेता वरुण धवनचा रिलीज झालेला अक्टूबर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच पसंती मिळते आहे. सध्या तो चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय करतो आहे. लवकरच तो कॅटरिना कैफसोबत रेमो डिसूझाच्या डान्स चित्रपटात दिसणार आहे.
रिपोर्टनुसार वरुण धवनला या चित्रपटा काम करण्यासाठी 32 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. कॅटरिना कैफला 7 कोटी तर रेमो डिसूझाला 12 कोटींची. रेमोला या चित्रपटाला 4D आणि IMAX फॉर्मेटमध्ये रिलीज करायचा आहे. वरुण करण जोहरच्या 'कलंक' या ड्रामा चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. यात त्याच्यासोबत आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. करण जोहर, साजिद नाडियाडवाला आणि अपूर्व मेहता निर्मित हा चित्रपट अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहे. पुढील वर्षी 19 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होईल.
तर सध्या कॅटरिना आनंद एल राय यांच्या 'झिरो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘झिरो’ चित्रपटात कॅटरिना कैफ शिवाय शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये आहेत.यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. शाहरूखसाठी गतवर्षी कमालीचे अनलकी ठरले. गतवर्षातील त्याचा अखेरचा चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ही बॉक्स आॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकला नाही.