​वरूण धवनला मिळाली ‘दुल्हनिया’; या महिन्यात होणार साखरपुडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2017 09:58 IST2017-07-16T04:28:24+5:302017-07-16T09:58:24+5:30

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या आयफा अवार्डच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये आहे. पण वरूण तिकडे न्यूयॉर्कमध्ये असताना, इकडे त्याच्या साखरपुड्याची चर्चा ...

Varun Dhawan gets 'Dulhania'; This month will be a shake! | ​वरूण धवनला मिळाली ‘दुल्हनिया’; या महिन्यात होणार साखरपुडा!

​वरूण धवनला मिळाली ‘दुल्हनिया’; या महिन्यात होणार साखरपुडा!

लिवूड अभिनेता वरूण धवन सध्या आयफा अवार्डच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये आहे. पण वरूण तिकडे न्यूयॉर्कमध्ये असताना, इकडे त्याच्या साखरपुड्याची चर्चा आहे. होय, वरूण लवकरच त्याची कथित गर्लफ्रेन्ड नताशा दलाल हिच्यासोबत साखरपुडा करून लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे.   वरूणवर जीव ओवाळणाºया फिमेल फॅन्सचे हृदय तोडणारी ही बातमी वेगाने व्हायरल होत आहे. सूत्रांचे मानाल तर, या महिन्या अखेरिस वरूण त्याची लाँग टाईम गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत साखरपुडा करू शकतो. वरूण व नताशा बालपणापासून मित्र आहे. वयात आल्यावर ही मैत्री प्रेमात बदलली. वरूणच्या प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये नताशा असते. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. अर्थात  वरूणने अद्याप या नात्याला दुजोरा दिलेला नाही. तसेच नताशासोबतचे रिलेशन नाकारलेही नाही.




ALSO READ :  ​‘या’ चित्रपटात जमणार वरूण धवन -अनुष्का शर्माची जोडी!
काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये वरूण व आलिया भट्ट हे दोघे आले होते. यावेळी तुझ्याकडे काय नाही? असा प्रश्न करणने वरूणला विचारला होता. या प्रश्नावर वरूणने आलियाकडे बघितले होते. मध्यंतरी वरूण व आलिया दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्याही चर्चेत होत्या. अर्थात आलिया सिद्धार्थ मल्होत्राच्या प्रेमात बुडाल्याचे कानोकानी झाल्यावर वरूण व तिच्या डेटींगच्या चर्चा आल्या तशा विरल्यात. त्यानंतर अचानक वरूण व नताशा यांच्या नात्याची चर्चा व्हायला लागली.
आता वरूण व नताशा हा दोघांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला म्हटल्यावर,यापेक्षा आनंदाची बातमी कुठली असेल. वरूण सध्या ‘जुडवा2’ या सिनेमात बिझी आहे. या चित्रपटात तो जॅकलिन फर्नांडिस व तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. वरूणचा हा चित्रपट १९९७ साली आलेल्या ‘जुडवा’चा सीक्वल आहे.

Web Title: Varun Dhawan gets 'Dulhania'; This month will be a shake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.