‘या’ चित्रपटात जमणार वरूण धवन -अनुष्का शर्माची जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 12:21 IST2017-07-04T06:51:46+5:302017-07-04T12:21:46+5:30
वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अनुष्का व वरूण या दोघांचा आॅनस्क्रीन रोमान्स ...
.jpg)
‘या’ चित्रपटात जमणार वरूण धवन -अनुष्का शर्माची जोडी!
व ुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अनुष्का व वरूण या दोघांचा आॅनस्क्रीन रोमान्स तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. यशराज बॅनरच्या आगामी चित्रपटात अनुष्का व वरूण लीड रोलमध्ये आहे. आता फार ताणून न धरता, या चित्रपटाचे नावही आम्ही तुम्हाला सांगून टाकतोय. होय, या चित्रपटाचे नाव आहे,‘सुई धागा- मेड इन इंडिया’. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का व वरूणची जोडी प्रथमच एकत्र येते आहे. सरत कटारिया यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर मनीष शर्मा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. यापूर्वी ‘दम लगाके हईशा’मध्ये मनीष व सरत यांच्या टीमने एकत्र काम केले होते.‘मेड इन इंडिया’च्या आयडॉलॉजीवर आधारित या चित्रपटात एक नवी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. वरूण व अनुष्का दोघेही याबद्दल कमालीचे उत्सुक आहेत. मला या चित्रपटाची स्क्रिप्ट प्रचंड आवडली. माझ्या चित्रपटातून स्वदेशीचे महत्त्व मी लोकांना पटवून देणार, याचा मला आनंद आहे, असे वरूण यासंदर्भात म्हणाला.
आज वरूण व अनुष्काने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर या चित्रपटाची घोषणा केली. सध्या वरूण ‘जुडवा2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. वरूणचा हा चित्रपट सलमान खानच्या १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’चा सीक्वल आहे. अनुष्काचे म्हणाल तर अनुष्काचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. यात ती शाहरूख खानसोबत दिसणार आहे.‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये अनुष्का बिझी आहे.काल सोमवारीच या चित्रपटाचे ‘बीच बीच में’ हे गाणे रिलीज झाले.