वरूण बनणार हॉकीपटू ध्यानचंद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 20:39 IST2016-06-11T15:03:13+5:302016-06-11T20:39:02+5:30
महान हॉकीपटू ध्यानचंद याला आपण सगळेच ओळखतो..सुमारे चार वर्षांपूर्वी ध्यानचंद यांचा मुलगा अशोक ध्यानचंद यांनी पित्याच्या आयुष्यावरील चित्रपटाचे अधिकार ...
.jpg)
वरूण बनणार हॉकीपटू ध्यानचंद?
म ान हॉकीपटू ध्यानचंद याला आपण सगळेच ओळखतो..सुमारे चार वर्षांपूर्वी ध्यानचंद यांचा मुलगा अशोक ध्यानचंद यांनी पित्याच्या आयुष्यावरील चित्रपटाचे अधिकार निर्माते पूजा शेट्टी व आरती शेट्टी यांना विकले होते. मात्र गत चारवर्षांत या चित्रपटाचे काम पुढे सरकले नव्हते. पण आत्ता शेट्टी सिस्टर्सनी मनावर घेतले आहे म्हणे. एका आॅनलाईन पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, शेट्टी भगिनींनी या प्रोजेक्टमध्ये करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनला सहभागी केले असून आता ध्यानचंद यांच्यावरील चित्रपट मार्गी लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा व आरतीने करणला याबद्दल सांगितले आणि करणला ही कल्पना भारीच आवडली. त्यामुळेच करण या चित्रपटाचा सहनिर्माता असणार आहे. विशेष म्हणजे करणने ध्यानचंद यांची भूमिका रणबीर कपूरला आॅफर केली होती. काही कारणास्तव रणबीरने ही आॅफर नाकारली. यानंतर ही आॅफर वरूण धवनला देण्यात आली. वरूणने या चित्रपटासाठी होकार दिल्याचे समजते. तेव्हा आगामी दिवसांत आणखी एक बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार आणि या बायोपिकमध्ये वरूण झळकणार..आहे मस्तच!!
![]()
वरूणने अलीकडे एक स्पोर्ट जर्सी घातलेला फोटो पोस्ट केला आहे. असा स्पोर्ट जर्सीतला फोटो पोस्ट करण्याचे कारण अद्यापतरी कळलेले नाही. पण हा फोटो हॉकीपटू ध्यानचंद यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकचेच संकेत देणारे असेल तर आॅल दी बेस्ट वरूण!!
वरूणने अलीकडे एक स्पोर्ट जर्सी घातलेला फोटो पोस्ट केला आहे. असा स्पोर्ट जर्सीतला फोटो पोस्ट करण्याचे कारण अद्यापतरी कळलेले नाही. पण हा फोटो हॉकीपटू ध्यानचंद यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकचेच संकेत देणारे असेल तर आॅल दी बेस्ट वरूण!!