वरूण व आलिया चौथ्यांदा येणार एकत्र !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 19:25 IST2016-07-21T13:55:05+5:302016-07-21T19:25:05+5:30
अभिनेता वरूण धवन व अभिनेत्री आलिया भट्ट ही सुपरहिट जोडी चौथ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. २०१२ मध्ये करण जोहरच्या ...

वरूण व आलिया चौथ्यांदा येणार एकत्र !
अ िनेता वरूण धवन व अभिनेत्री आलिया भट्ट ही सुपरहिट जोडी चौथ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. २०१२ मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’मधून वरूण व आलिया यांनी बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ही जोडी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये दिसली. सध्या वरूण व आलिया ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’मध्ये काम करीत आहे. यानंतर करण जोहर बॅनरच्या चौथ्या चित्रपटातही हीच जोडी झळकणार असल्याचे वृत्त आहे. ‘२ स्टेट्स’ दिग्दर्शित करणारे अभिषेक बर्मन हा नवा चित्रपट दिग्दर्शित करतील. हा चित्रपट म्हणजे प्रेमाचा त्रिकोण असल्याचे कळते. वरूण शिवाय यात दुसरा हिरो कोण असेल, हे अद्याप कळलेले नाही.