​कॅटरिनासोबत नाही तर या अ‍ॅक्टरसोबत रणबीर साजरा करणार ‘व्हॅलेन्टाईन डे’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 14:18 IST2017-01-12T14:18:33+5:302017-01-12T14:18:33+5:30

आपल्या अफेअर्ससाठी कायम चर्चेत राहणारा अभिनेता रणबीर कपूर लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ आहे. त्याच्या एका हाकेवर हजारो मुली त्याच्यावर ...

Valentine's day will be celebrated with actor Ranbir, not with Katrina! | ​कॅटरिनासोबत नाही तर या अ‍ॅक्टरसोबत रणबीर साजरा करणार ‘व्हॅलेन्टाईन डे’!

​कॅटरिनासोबत नाही तर या अ‍ॅक्टरसोबत रणबीर साजरा करणार ‘व्हॅलेन्टाईन डे’!

ल्या अफेअर्ससाठी कायम चर्चेत राहणारा अभिनेता रणबीर कपूर लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ आहे. त्याच्या एका हाकेवर हजारो मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकतील. अनेकजणी रणबीरसोबत डेटवर जाण्याच्या स्वप्नात गुंग असतील. पण रणबीर मात्र एका अभिनेत्याचा ‘दीवाना’ आहे. ऐकून धक्का बसला ना? पण होय, रणबीर या अभिनेत्याचा इतका ‘दीवाना’ आहे की, यंदाचा व्हॅलेन्टाईन डे तो त्याच्यासोबत साजरा करणार आहे.

चला, या रहस्यावरून  पडदा उठवू या. हा अभिनेता आणखी कुणी नाही तर संजय दत्त आहे. राजकुमार हिरानी संजय दत्तच्या आयुष्यावर एक बायोपिक घेऊन येत आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या चित्रपटाचे शूटींग येत्या १४ फेबु्रवारीपासून सुरु होतेय. म्हणजेच काय तर, येणा-या व्हॅलेन्टाईन डेला रणबीर कपूर व संजय दत्त दोघेही या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना सोबत असणार आहेत.



रणबीर कपूर अनेक वर्षे दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण त्यांचे बे्रकअप झाले आणि रणबीरचे नाव कॅटरिना कैफसोबत जोडले गेले. दोघेही वर्षभर लिव्ह-इनमध्ये राहिले. पण या दोघांचेही कालांतराने फाटले. कॅटरिनासोबतही रणबीरचे ब्रेकअप झाले. त्यामुळे रणबीर सध्या सिंगल आहे. लवकरच रणबीर कपूर व कॅटरिना कैफ या दोघांचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ब्रेकअपनंतरचा या दोघांचा हा पहिला सिनेमा आहे. बे्रकअपनंतर लगेच या चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्याने कॅट व रणबीर दोघेही यादरम्यान बरेच अनकम्फर्टेबल होते. पण प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल लाईफ येऊ द्यायचे नाही, असेच कॅट व रणबीरने ठरवले आणि ‘जग्गा जासूस’ रिलीजसाठी तयार झाला. ‘जग्गा जासूस’नंतर प्रतीक्षा असेल ती संजय दत्तच्या बायोपिकची आणि यातील रणबीरच्या भूमिकेची.

Web Title: Valentine's day will be celebrated with actor Ranbir, not with Katrina!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.