​उषा खन्ना आणि उदित नारायण यांना २०१६चा मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 12:10 IST2016-12-22T12:10:01+5:302016-12-22T12:10:01+5:30

एका पेक्षा एक दर्जेदार गाण्यांना संगीतबद्ध केलेल्या भारतीय सिने इतिहासातील पहिल्या महिला संगीतकार उषा खन्ना यांना यावर्षीचा मोहम्मद रफी ...

Usha Khanna and Udit Narayan to be given the Mohammad Rafi Award for 2016 | ​उषा खन्ना आणि उदित नारायण यांना २०१६चा मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर

​उषा खन्ना आणि उदित नारायण यांना २०१६चा मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर

ा पेक्षा एक दर्जेदार गाण्यांना संगीतबद्ध केलेल्या भारतीय सिने इतिहासातील पहिल्या महिला संगीतकार उषा खन्ना यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर ख्यातनाम गायक उदित नारायण यांनाही हा पुरस्कार प्रदान करणार येणार आहे.
अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव आणि  मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे नववे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असते तर ५१ हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप असते. मोहम्मद रफी यांच्या उपस्थितीत दरवर्षी या पुरस्काराचा शानदार सोहळा पार पडतो. गेल्या आठ वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा येथे २४ डिसेंबरला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे ‘फिर रफी’ या बहारदार मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी या कार्यक्रमात सादर करणार आहेत.   
यापुर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमित कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगीतकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, प्यारेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम या कलावंतासह, निवेदक अमिन सयानी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Usha khanna music director





Web Title: Usha Khanna and Udit Narayan to be given the Mohammad Rafi Award for 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.