गरीब वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सारा अली खानला यूजर्सनी सुनावले, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 21:55 IST2018-06-01T16:25:19+5:302018-06-01T21:55:57+5:30

सारा अली खानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये ती एका गरीब वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ!

Users of Sarah Ali Khan, who neglected the poor old woman, said, watch the video! | गरीब वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सारा अली खानला यूजर्सनी सुनावले, पाहा व्हिडीओ!

गरीब वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सारा अली खानला यूजर्सनी सुनावले, पाहा व्हिडीओ!

रा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी असलेल्या साराचा हा डेब्यू चित्रपट गेल्या काहीकाळापासून सातत्याने वादाच्या भोवºयात सापडताना दिसत आहे. याच दरम्यान तिने अभिनेता रणवीर सिंगचा ‘सिम्बा’देखील साइन केला आहे. तिच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. दरम्यान, साराच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरेचसे व्हिडीओ शेअर केले जातात. कधी पापा सैफसोबत ती तर कधी पार्टीत जातानाचे तिचे व्हिडीओ बघावयास मिळतात. बºयाचदा तर जीम आणि योगा क्लासला जातानाचेही तिचे व्हिडीओ समोर आले आहेत. आता साराचा असाच एक व्हिडीओ समोर आला असून, सोशल मीडियावर तो वाºयासारखा व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये सारा अली खान एका रेस्टॉरेंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. ती घाईतच रेस्टॉरंटबाहेर निघते. तेव्हा तिला एक गरीब महिला दिसते. तिला बघून सारा आपली वाट बदलते. पुढे कारकडे धावत जात तेथून निघून जाते. सारा एक स्टार आहे, त्यामुळे तिला बºयाचदा असे निर्णय पुढे घ्यावे लागणार आहेत. कारण बºयाचशा प्रसंगामध्ये चाहत्यांचा तिला सामना करावा लागणार आहे. मात्र साराच्या या अशा वागण्यावर सोशल मीडिया यूजर्स प्रचंड संतापला आहे. त्याने जाहीरपणे त्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 
 

बºयाचशा यूजर्सनी हा व्हिडीओ बघितल्यानंतर म्हटले की, ‘अशा लोकांना इतके अटेंशन का दिले जाते? एकाने लिहिले, ‘त्या गरीब महिलेला काही पैसे दिले असते तर तू तिच्यासारखी गरीब झाली नसती. यार तुम्ही पैशेवाले लोक कसे आहात?’ अनेकांनी तर साराच्या या अ‍ॅटिट्यूडवर चांगलीच नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तिला खडेबोल सुनावले. मात्र वास्तवास सेलिब्रिटीजना अशा स्थितीत असे निर्णय घ्यावे लागतात, हेही तेवढेच खरे म्हणावे लागेल. 

Web Title: Users of Sarah Ali Khan, who neglected the poor old woman, said, watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.