कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर होता शाहीद कपूर, असं बदलले नशीब !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 15:02 IST2021-02-25T14:50:13+5:302021-02-25T15:02:03+5:30
Shahid Kapoor used to work as a background dancer : शाहिद कपूर हा आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर होता शाहीद कपूर, असं बदलले नशीब !
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करतो आहे. शाहिद बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाबरोबरच डान्स, लूकसाठी देखील ओळखला जातो. शाहिद कपूरचा जन्म दिल्लीत झाला. वडिलांचे नाव पंकज कपूर आहे, जे एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता निर्माता आहेत. त्याची आई नीलिमा अजीम आहे. त्याला सना कपूर, ईशान खट्टर आणि रुहान कपूर असे तीन भावंड आहेत. ईशान खट्टरने ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
शाहिद कपूर हा आज बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे, परंतु त्याने टीव्हीवरील जाहिरांतीमध्ये आणि बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनसुद्धा काम केलं आहे. ऐश्वर्या रायच्या ताल आणि करिश्मा कपूरच्या 'दिल तो पागल है' सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून शाहिदने काम केलं. 'इश्क विश्क' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री शूट करणाऱ्या शाहिदने पहिल्याच सिनेमातून रसिकांची मनं जिंकली. या सिनेमासाठी शाहिदला सर्वोत्कृष्ट डेब्यूसाठी दार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
2006 मध्ये सूरज बड़जात्या यांच्या 'विवाह' सिनेमा हिट झला होता. 2007 मध्ये इम्तियाज अलीचा 'जब वी मेट' हा शाहिदच्या करिअरमधला सर्वौत्तम सिनेमांपैकी एक आहे. 2009मध्ये शाहिदला विशाल भारद्वाजच्या 'कामिने' या चित्रपटात केलेल्या अभिनय केल्याबद्दल त्याचे कौतुक झाले.
शाहिदची करिना कपूरसोबतची जोडीही चांगलीच गाजली होती. त्या दोघांनाही पडद्यावर प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. शाहिद आणि करिनाच्या अफेअर्सच्या बातम्याही चर्चेत आल्या. मात्र, करीनाने सैफ अली खानशी लग्न केले आणि शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले.
मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या वयात 13 वर्षांचं अतंर आहे, मीरा आणि शाहिदचे 2015 साली लग्न झाले होते. दोघांचे अरेंज मॅरेज आहे. मीरा आणि शाहिदचे काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत गुरुग्राममध्ये एका खासगी समारंभात लग्न झाले होते. मीशा कपूर आणि जैन कपूर अशी दोन सुंदर मुले या कपल आहेत.