​असफल प्रेमाचा नायक ‘गुरूदत्त’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:25 IST2017-02-12T11:55:35+5:302017-02-12T17:25:35+5:30

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा विविध पातळीवर आपल्या कामांचा ठसा उमटविणाºया गुरूदत्त (मुळ नाव वसंतकुमार शिवशंकर पादुकोण) यांचे जीवन जितके ...

Unfair Love's protagonist 'Gurudatta' | ​असफल प्रेमाचा नायक ‘गुरूदत्त’

​असफल प्रेमाचा नायक ‘गुरूदत्त’

िनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा विविध पातळीवर आपल्या कामांचा ठसा उमटविणाºया गुरूदत्त (मुळ नाव वसंतकुमार शिवशंकर पादुकोण) यांचे जीवन जितके सफल होते, तितकाच त्यांचा मृत्यू गूढ ठरला. वहिदा रहमान यांच्यासोबतचे त्यांचे प्रेमप्रकरण खूप गाजले. गुरूदत्त यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश...



कोलकात्यामध्ये टेलिफोन आॅपरेटर असणाºया गुरूदत्त यांनी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईची वाट धरली. पुण्याच्या प्रभात फिल्म स्टुडिओत त्यांच्या काकांनी त्यांना नोकरीस लावले. या ठिकाणी त्यांना अभिनेते रहमान आणि देव आनंद हे भेटले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९४४ साली त्यांनी छोट्या भूमिकांना प्रारंभ केला. पी. एल. संतोषी यांच्याकडे ते सहायक दिग्दर्शक म्हणून होते. पुण्याहून मुंबईत नवकेतनमध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. देव आनंद आणि गुरू दत्त यांच्यात त्यावेळी ठरले की, जर देव आनंद यांनी चित्रपट काढला तर ते दिग्दर्शक म्हणून गुरूदत्त यांना स्वीकारतील आणि गुरूदत्त यांनी चित्रपट काढला तर ते देव आनंद यांना हिरो म्हणून स्वीकारतील.



साहिब बिवी और गुलाम, चौदहवी का चाँद, कागज के फुल, प्यासा, आर पार, सी. आय. डी., बहारें फिर भी आऐंगी अशा नामवंत चित्रपटांशी त्यांचा संबंध आला. १९५३ साली त्यांनी गुरूदत्त यांनी गायिका गीता दत्त यांच्याशी लग्न केले. तीन वर्षे त्यांचे संबंध होते. ज्यावेळी त्यांच्या लग्नाचा प्रसंग आला, त्याला घरातून विरोध झाला. तरीही त्यांनी लग्न केले. त्यांना तरूण, अरूण आणि नीना ही तीन मुले. काही वर्षानंतर गीता दत्त आणि गुरूदत्त यांच्यात वाद होऊ लागले. वहिदा रहमान यांच्या संबंधामुळे या दोघांमधील वाद विकोपाला गेले. 
गुरूदत्त आणि वहिदा रहमान यांची भेट गंमतशीर आहे. एकदा गुरूदत्त आणि त्यांचे मित्र अबरार अल्वी हैदराबादला गेले होते. एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की एक महिला गाडीतून उतरताना मुलांचा प्रचंड गोंधळ सुरू झाला. त्यावेळी गुरू दत्त यांनी वितरकाला विचारले कोण ही महिला? त्यावर त्या वितरकाने सांगितले की ही ‘रोजुलू मराई’ या तेलुगू चित्रपटाची डान्सर आहे. या चित्रपटाचे १०० दिवस नुकतेच पूर्ण झाले आहेत. नाव काय म्हटल्यावर ‘वहिदा रहमान’ असे सांगितले. गुरूदत्त यांनी वहिदाला भेटावयाचे ठरविले. समोर गेल्यानंतर वहिदा अत्यंत साध्या वेशात, कोणतीही लिपस्टीक न लावता समोर आली. ‘अब मैं चलुंगी’ म्हणत वहिदा निघून गेल्या. सीआयडी आणि प्यासा चित्रपटासाठी गुरूदत्त यांना अभिनेत्री हवी होती, त्यांच्यासमोर वहिदाचे नाव आले. गुरूदत्तना वहिदाचे नाव बदलायचे होते, परंतू वहिदा यांनी नकार दिला. 



कागज के फुल या चित्रपटामुळे त्यांना १५ दशलक्ष इतका तोटा झाला. तरीही त्यांनी हार मानली नाही. आपल्या टीमवर त्यांचा भरवसा होता. पुढच्या चित्रपटातून झालेला तोटा भरून काढू असा त्यांना विश्वास वाटू लागला. राज कपूर, मेहबूब खान आणि बिमल रॉय यांच्याप्रमाणेच तेही मोठे दिग्दर्शक होते. त्यांचा प्यासा हा चित्रपट ‘टाईम’ १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटापैकी एक. प्यासा, कागज के फुल हे कलात्मकदृष्टीने चित्रपट गाजले.
्नगुरूदत्त हे वहिदांच्या प्रेमात पडले होते. त्यांना गीता दत्त यांना घटस्फोट द्यायचा नव्हता आणि वहिदांनाही सोडायचे नव्हते. अशी द्विधा मन:स्थिती गुरूदत्त यांची झाली होती. ज्यावेळी गीता दत्त यांनी त्यांना सोडून गेल्या, त्यावेळी त्यांनी गोळ्या घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी वहिदा रहमान चेन्नई येथे होत्या.

Web Title: Unfair Love's protagonist 'Gurudatta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.