सलमान खानला भेटण्यासाठी युलिया वंतूर जाणार अबू धाबीला ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 15:39 IST2017-08-10T10:05:25+5:302017-08-10T15:39:35+5:30
तब्बल पाच वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफची जोडी 'टायगर जिंदा है'मध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. ...

सलमान खानला भेटण्यासाठी युलिया वंतूर जाणार अबू धाबीला ?
त ्बल पाच वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफची जोडी 'टायगर जिंदा है'मध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे ज्याचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. त्याच्या सीक्वलचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करतो आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम मोरक्कामध्ये शूटिंग संपवून सध्या अब्बू धाबीमध्ये आहे.पिंकविलाच्या रिपोर्टनुसार चित्रपटाचे 70 टक्के पूर्ण झाले आहे आणि उरलेले शूटिंग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. सलमानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसुद्धा सलमानला अब्बू धाबीमध्ये ज्वाईन करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार युलिया आणि कॅटरिना या दोघींना सलमानच्या आयुष्यात असलेली आपली आपली जागा माहिती आहे त्यामुळे दोघींमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नाही आहे. सलमान आणि कॅटरिना यांच्या दोघांमधील दुरावा संपल्याचा कळतो आहे. दोघांनी आपल्या नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.दोघांमधील केमिस्ट्री खुलू लागली आहे. दोन शॉर्ट्समध्ये असलेल्या वेळेत दोघे तासनतास बसून गप्प मारतात. सलमान कॅटरिनाला अनेक गोष्टींचे ज्ञान देत असतो. सुरुवातीला कॅटरिना ऐकत नव्हती मात्र आता तीही सगळ्या गोष्टी लक्ष देऊन ऐकते. IIFA अॅवॉर्ड 2017मध्ये न्यूयॉर्कमध्ये दोघे ही एकमेकांसोबत हातात हात घालून फिरताना दिसेल होते आणि पुन्हा एकदा दोघांच्या नात्याला घेऊन चर्चा सुरु झाली होती.