U must be knowing : ‘क्वांटिको2’च्या सेटवर प्रियांका चोप्राला असा झाला अपघात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 14:56 IST2017-01-20T14:56:21+5:302017-01-20T14:56:21+5:30
तुमच्या आमच्या लाडक्या पीसीला अर्थात प्रियांका चोप्राला सेटवर अपघात झाल्याची बातमी आली आणि सगळ्यांनाच धस्स् झाले. सुदैवाने हा अपघात ...
.jpg)
U must be knowing : ‘क्वांटिको2’च्या सेटवर प्रियांका चोप्राला असा झाला अपघात!
त मच्या आमच्या लाडक्या पीसीला अर्थात प्रियांका चोप्राला सेटवर अपघात झाल्याची बातमी आली आणि सगळ्यांनाच धस्स् झाले. सुदैवाने हा अपघात किरकोळ होता. या अपघातातून प्रियांका बरी झाली. काल झालेल्या पीपल्स चॉईस अवॉर्ड्स २०१७ ला तिने हजेरी लावली. दिलखुलास प्रियांका पीपल्स अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरली, तेव्हा कुठे तिच्या सगळ्या चाहत्यांना हायसे वाटले. पण प्रियांकाला नेमका अपघात झाला कसा? रेड कार्पेटवरही तिला हाच प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना प्रियांकाने आपबीती सांगितली.
‘क्वांटिको2’च्या सेटवर प्रियांकाला हा अपघात झाला. त्याबद्दल ती म्हणाली, ‘क्वांटिको2’च्या काही अॅक्शन दृश्यांचे शूटींग सुरु होते. त्यावेळी थोडाफार पाऊस पडत होता आणि मी वेंधळ्या मुलीसारखे रबराचे बूट घातले होते. निसरड्या रस्त्यावर त्यातही रबराचे बूट घालून शूटींग सुरु असताना कुणीतरी घसरले आणि त्याना वाचविण्याच्या नादात मीच घसरले. रस्त्यावरच्या गाडीच्या बंपरला आणि रस्त्याला माझं डोक धडकलं आणि त्यामुळे डोक्याला मार लागला. यानंतर लगेच मला रूग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला. मग काय, तीन दिवस मी कामावर नव्हते. त्या तीन दिवसांत सोफ्यावर मस्तपैकी आॅडिओ बुक्स ऐकत बसले होते. कारण काय, तर मला टीव्ही न पाहण्याचा आणि पुस्तकं न वाचण्याचे डॉक्टरांनी सक्तीने बजावले होते.
या अपघाताचा आगामी चित्रिकरणातील अॅक्शन दृश्यांच्या शूटवर काही परिणाम होणार का? असेही प्रियांकाला विचारण्यात आले. पण नाही, असे काहीही नसल्याचे सांगत प्रियांकाने तिच्या चाहत्यांना दिलासा दिला. काही दिवस मला त्रास होईलच. पण, त्याची काळजी घ्यावी लागेल. मी लवकरच पूर्वपदावर येइन. मी आता शूटींग सुरु केले आहे, असे तिने सांगितले.
‘क्वांटिको’सीरिजमधील प्रियांकाच्या अभिनयाने हॉलिवूडकरांची मने जिंकलीत. लवकरच प्रियांकाचा पहिला-वहिला हॉलिवूडपट ‘बे-वॉच’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.