दोन वर्षांनंतर पुन्हा गाणार लतादीदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 20:14 IST2017-01-03T20:14:37+5:302017-01-03T20:14:37+5:30
गान कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाºया लता मंगेशकर आता ८७ वर्षांच्या आहेत. या वयातही त्यांना गाण्याचा मोह आवरता येत नाही ...
.jpg)
दोन वर्षांनंतर पुन्हा गाणार लतादीदी
वयाच्या १३ व्या वर्षांपासून गायनाला सुरुवात करणाºया लतादीदी वयाच्या ८७ व्या वर्षी देखील त्याच उत्साहाने गाण्यास तयार आहेत. लता मंगेशकर लवकरच काही संस्कृत श्लोकांना आपला आवाज देणार असून, लवकरच त्या रेकॉर्डिंग करणार आहेत. लता मंगेशकर म्हणाल्या. मागील दोन वर्षांपासून मी गायनाला मिस करीत आहे. ही दोन वर्षे माझी प्रकृ ती देखील चांगली नव्हती, म्हणूनही मी गाण्याचा प्रयत्न केलाच नाही. मात्र यावर्षी माझी प्रकृती चांगली आहे व गायनाचा विचार करीत आहे. लवकरच मी राम रक्षा स्त्रोत्रामधील ३८ श्लोकांचे गायन करणार आहे. मला आधीपासून खूप गायचे होते. मी गायले देखील मात्र मागील दोन वर्षांत मी फार गायलेच नाही. आता पुन्हा एकदा गायन करताना मला आनंद होत आहे. असेही लता मंगेशकर यांनी सांगितले.
भक्तीसंगीताचे भीमसेन जोशी सोबत केलेले माझे दोन अल्बम नव्या पिढीच्या श्रोत्यांना आवडले याचा मला आनंद आहे. मी मागील आठवड्यात मयुरेश पै यांच्या संगीत दिग्दर्शनात काही श्लोकांचे रेकॉर्डिंग केले आहेत असे सांगून, त्यानी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझा भाऊ हृदयनाथ मंगेशकर याच्या सोबत गायन करणे माझ्यासाठी नेहमीच कठीण ठरले. चला वही देस, मीरा बाई व कबिराचे दोहे हे माझ्या नेहमीच आवडीचे आहे असेही लतादीदी म्हणाल्या. लता मंगेशकर यांचा आवाज पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे यात शंका नाही असे म्हणायला हरकत नाही.