ट्विंकल खन्नाला 'या' गोष्टीत मागे टाकले दिव्या दत्ताने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:22 IST2018-04-25T08:52:46+5:302018-04-25T14:22:46+5:30

यावेळच्या स्कोर ट्रेड्स इंडिंयाच्या ‘परिपक्व’ अभिनेत्रींच्या यादीत अष्टपैलू अभिनेत्री दिव्या दत्ता पहिल्या स्थानी आहे. तर ‘परिपक्व’ अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता ...

Twinkle Khanna's 'behind' thing Divya Dattana | ट्विंकल खन्नाला 'या' गोष्टीत मागे टाकले दिव्या दत्ताने

ट्विंकल खन्नाला 'या' गोष्टीत मागे टाकले दिव्या दत्ताने

वेळच्या स्कोर ट्रेड्स इंडिंयाच्या ‘परिपक्व’ अभिनेत्रींच्या यादीत अष्टपैलू अभिनेत्री दिव्या दत्ता पहिल्या स्थानी आहे. तर ‘परिपक्व’ अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान सर्वोच्च स्थानी आहे.

विद्या बालन, रविना टंडन, जुही चावला, शिल्पा शेट्टी ह्या ग्लॅमरस आणि ‘मॅच्युअर्ड’ अभिनेत्रींना मागे टाकत दिव्या दत्ता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. दिव्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ब्लॅकमेल ह्या चित्रपटामध्ये तिने साकारलेल्या ‘डॉली’ या व्यक्तिरेखेचे कौतुक झाले तसेच तिच्या इरादा चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित झाला त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ती सोशल डिजिटल प्लॅटफॉर्मवर सतत चर्चेत राहिली होती.

त्यामुळेच तर दिव्याने 13.08 गुणांसह सर्वोच्च स्थान प्राप्त केले. तिच्यापाठोपाठ अभिनेत्री आणि स्तंभलेखिका ट्विंकल खन्नाने 12.66 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे.

परिपक्व अभिनेत्यांच्या यादीत सलमान खानने 89.52 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. सलमानने त्याचे प्रतिस्पर्धी अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान आणि हृतिक रोशन यांना मागे टाकले आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  हि प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “व्हायरल न्यूज, ट्विटर आणि ब्रॉडकास्टमाध्यमांमध्ये दिव्या गेल्या काही दिवसांत चर्चेत राहिली. त्यामुळेच ती 'परिपक्व' श्रेणीमध्ये सर्वोच्च स्थान मिळवू शकली. त्याचप्रमाणे सलमान या आठवड्यात सामान्य आणि परिपक्व दोन्ही श्रेणींमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे."

अश्वनी कौल पुढे म्हणतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हुन अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Web Title: Twinkle Khanna's 'behind' thing Divya Dattana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.