ट्विंकल खन्ना म्हणते, मी अभिनेत्री म्हणून फ्लॉप झाले; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 11:17 IST2017-03-29T05:47:09+5:302017-03-29T11:17:09+5:30

‘फ्लॉप’चा शिक्का घेऊन जगणारे बॉलिवूडमध्ये अनेक आहेत. पण यापैकी काही हा शिक्का अभिमानाने मिरवत, पुढच्या प्रवासाला निघतात आणि एका ...

Twinkle Khanna says, I flopped as an actress; But ... | ट्विंकल खन्ना म्हणते, मी अभिनेत्री म्हणून फ्लॉप झाले; पण...

ट्विंकल खन्ना म्हणते, मी अभिनेत्री म्हणून फ्लॉप झाले; पण...

्लॉप’चा शिक्का घेऊन जगणारे बॉलिवूडमध्ये अनेक आहेत. पण यापैकी काही हा शिक्का अभिमानाने मिरवत, पुढच्या प्रवासाला निघतात आणि एका वळणावर यशाचे शिखर गाठतात. अभिनेत्री ट्विंकल खन्ना यापैकीच एक. डिंम्पल कपाडिया आणि दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाची मुलगी, अक्षय खन्नाची पत्नी यापलीकडे ट्विंकलची एक स्वतंत्र वेगळी ओळख आहे. आज एक लेखिका म्हणून ती नावारूपास आली आहे. कधीकाळी ट्विंकलनेही एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले. पण यात ती अपयशी ठरली. ‘बरसात’,‘जब प्यार किसीसे होता है’,‘मेला’,‘बादशहा’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. पण तिचे हे सिनेमे बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले आणि ट्विंकलवर ‘फ्लॉप हिरोईन’चा शिक्का बसला. पण ट्विंकलने कधीच हा शिक्का पुसण्याचे प्रयत्न केले नाहीत. कारण तिला याचा कुठलाच पश्चाताप नाही. कारण मी एक चांगली अभिनेत्री नाही, हे कबुल करण्याची धमक तिच्यात आहे. अलीकडे एका मुलाखतीत तिने हे बोलून दाखवले. मी एकही हिट सिनेमा दिला नाही. हे सत्य आहे. पण मला त्याचा पश्चाताप नाही. मी कलाकार म्हणून नाही पण एक लेखिका म्हणून यशस्वी झालेय. कदाचित मी एक चांगली लेखिका आहे. हे करिअर आयुष्यभर माझ्यासोबत असणार आहे, ही एकच गोष्ट माझ्यासाठी पुरेशी आहे, असे ती म्हणाली. 

ALSO READ : ट्विंकलने गुपचूप घेतला ‘या’ बाबाचा फोटो!

अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यावर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने इंटिरियर डिझाईनिंगमध्ये काम करणे सुरु केले. शिवाय लिहायला लागली. तिचे ‘मिसेस फनी बोन्स’ हे पुस्तक चांगलेच गाजले. आज एक स्तंभलेखिका अशीही ट्विंकलची ओळख आहे. 

Web Title: Twinkle Khanna says, I flopped as an actress; But ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.