Twinkle बनणार ‘चेतन भगत’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 21:07 IST2016-03-21T04:07:37+5:302016-03-20T21:07:37+5:30
शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना, पण हे आमचे नाही, तर खुद्द टिष्ट्वंकल खन्ना हिच्याच तोंडचे वाक्य आहे. अभिनेत्रीची लेखिका ...

Twinkle बनणार ‘चेतन भगत’!!
श र्षक वाचून आश्चर्य वाटले ना, पण हे आमचे नाही, तर खुद्द टिष्ट्वंकल खन्ना हिच्याच तोंडचे वाक्य आहे. अभिनेत्रीची लेखिका झालेल्या टिष्ट्वंकलचे गतवर्षी ‘मिसेज फनीबोन्स’ नामक पुस्तक प्रकाशित झाले. दोन अग्रणी वृत्तपत्रांमध्ये नियमित कॉलम लिहून स्तंभलेखिका होण्याचा मानही तिने मिळवला. आता टिष्ट्वंकलला चित्रपटाच्या पटकथा लिहिण्याचा मोह होतोय. माझ्या डोक्यात एका कथेची आयडिया आहे. मी पटकथा लिहू शकेल की नाही, मला ठाऊक नाही. पण मी एक कथा लिहू शकते आणि दुसरे कुणी त्यावर पटकथा लिहू शकते, असे टिष्ट्वंकल म्हणाली...इतके बोलून थांबणार ती टिष्ट्वंकल कुठली! ‘चेतन भगत बनने का लक्ष्य भीतर में खलबली मचा रहा है.’ शेवटी अशी गुगली तिने टाकलीच.