​राजमौली घेऊन येणार ‘बाहुबली’वर आधारित टीव्ही सीरिज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 13:15 IST2017-04-02T07:45:43+5:302017-04-02T13:15:43+5:30

‘बाहुबली’ने एक अद्भूत इतिहास रचला. लवकरच ‘बाहुबली’चा दुसरा भाग अर्थात ‘बाहुबली2’ हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे. पण आता ...

TV series based on 'Bahubali' to be taken by Rajmoule | ​राजमौली घेऊन येणार ‘बाहुबली’वर आधारित टीव्ही सीरिज!

​राजमौली घेऊन येणार ‘बाहुबली’वर आधारित टीव्ही सीरिज!

ाहुबली’ने एक अद्भूत इतिहास रचला. लवकरच ‘बाहुबली’चा दुसरा भाग अर्थात ‘बाहुबली2’ हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे. पण आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर छोट्या पडद्यावरही ‘बाहुबली’ आपल्या भेटीस येणार आहे. काय? ऐकून धक्का बसला ना, पण हे खरे आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी ‘बाहुबली’वर आधारित एक टीव्ही सीरिज आणण्याची घोषणा केली आहे.
  ‘बाहुबली’ची कथा पुस्तक रूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्यात राजमौली यशस्वी झाले.    ‘बाहुबली’ची संपूर्ण कथा कथन करणारे ‘राइज आॅफ शिवगामी: बाहुबली बिफोर दी बिगीनिंग’ नामक पुस्तक बाजारात आले आहे. आता याच पुस्तकावर आधारित टीव्ही सीरिज आणण्याची राजमौली यांची योजना आहे. अलीकडे राजमौली यांनी याबाबतची घोषणा केली.   ‘बाहुबली’वर एक टीव्ही शृंखला आणण्याची माझी योजना आहे. अर्थात हे डेली सोप नसेल तर १० ते १३ भागांचा एक सिझनल शो असेल. ‘राइज आॅफ शिवगामी: बाहुबली बिफोर दी बिगीनिंग’  हे पुस्तक आनंद नीलकांतन यांनी लिहिले आहेत.

ALSO READ : bahubali-2 trailer : केवळ अदभूत! डोळे दिपवून टाकणारा प्रोमो!!

जयपूर साहित्य महोत्सवात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला होता. यावेळी  राजामौली यांच्यासोबतच राणा डग्गूबाती हाही हजर होता. यावेळी त्याने या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवले होते. या पुस्तकात ‘बाहुबली : दी बिगीनिंग’ आधीची संपूर्ण  कथा आहे. म्हणजेच शिवगामी आपल्या पित्याच्या हत्येचा सूड कसा घेतो, हे यात वाचायला मिळणार आहे. चित्रपटात ही भूमिका राम्या कृष्णन हिने साकारली आहे. ‘बाहुबली : दी बिगीनिंग’चा दुसरा भाग ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’ हा बहुप्रतिक्षती चित्रपट येत्या एप्रिलमध्ये रिलीज होतोय.

Web Title: TV series based on 'Bahubali' to be taken by Rajmoule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.