‘मुन्ना मायकल’मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी सोलो डान्स करून टायगर श्रॉफला देणार टशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 17:20 IST2017-06-11T11:50:32+5:302017-06-11T17:20:32+5:30

आगामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या डान्स कौशल्याचा कस लावताना दिसणार आहे. कारण त्याला चित्रपटात एक ...

Tusshar will give Tiger Shroff to Nawazuddin Siddiqui solo dance in 'Munna Michael' | ‘मुन्ना मायकल’मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी सोलो डान्स करून टायगर श्रॉफला देणार टशन!

‘मुन्ना मायकल’मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी सोलो डान्स करून टायगर श्रॉफला देणार टशन!

ामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या डान्स कौशल्याचा कस लावताना दिसणार आहे. कारण त्याला चित्रपटात एक अभिनेता कडवी टक्कर देताना बघावयास मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, हा अभिनेता कोण? तर हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही नसून चित्रपटात निगेटीव्ह भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दिकी आहे. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल की, डान्सच्या बाबतीत नवाज टायगरला खरंच टक्कर देऊ शकेल काय? तर याचे उत्तर होय असे आहे. कारण चित्रपटात नवाज चक्क सोलो डान्स परफॉर्मन्स करताना बघावयास मिळणार आहे. 

सबीर खान दिग्दर्शित ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ, निधी अग्रवाल आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे दमदार भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची संपूर्ण कथा टायगर श्रॉफच्या अवती-भोवती फिरणारी असून, टायगर चित्रपटात स्ट्रीट डान्सरची भूमिका साकारत आहे. तर नवाजुद्दीन निगेटीव्ह भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटात नवाजचे निधी अग्रवाल हिच्यावर प्रेम जडत असून, तिला इम्प्रेस करण्यासाठी तो डान्स शिकण्याचा निर्णय घेतो. याकरिता तो टायगरची मदत घेतो. 



मात्र कथेत ट्विस्ट तेव्हा निर्माण होते जेव्हा निधी नवाजशी नव्हे तर टायगरच्या प्रेमात पडते. चित्रपटात डान्सचे जबरदस्त परफॉर्मन्स बघावयास मिळणार आहेत. मात्र अशातही चित्रपटाचे हायलाइट नवाजचा डान्स असेल. ही बाब खुद्द टायगरने मान्य केली असून, त्याने नवाजचा डान्स बघणे मजेशीर असेल, असे वक्तव्य केले आहे. नवाजने या अगोदर शाहरूख खानच्या ‘रईस’मध्ये दोन मिनिटांचा डान्स केला होता. त्याचा हा परफॉर्मन्स बघून एक गोष्ट निश्चित वाटत होती, ती म्हणजे आगामी काळात नवाज आपल्यातील डान्सचा गुण सर्वांना दाखवून देईल. आता त्याला ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात ती संधी मिळाली आहे. 

‘मुन्ना मायकल’मधून टायगर दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्शनला ट्रिब्यूट देणार आहे. चित्रपटात टायगर एक स्ट्रीट डान्सर म्हणून भूमिका साकारत असून, लहानपणी रस्त्यावर डान्स करून तो पैसे कमवित असतो. एक दिवस नॅशनल डान्स स्पर्धेत त्याला भाग घेण्याची संधी मिळते. तेथूनच त्याचा संघर्ष सुरू होतो. ‘मुन्ना मायकल’मधून तिसºयांदा दिग्दर्शक साबिर खान आणि टायगर श्रॉफ एकत्र काम करीत आहेत. हा चित्रपट २१ जुलै रोजी रिलीज केला जाणार आहे. 

Web Title: Tusshar will give Tiger Shroff to Nawazuddin Siddiqui solo dance in 'Munna Michael'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.