Tubelight : ​सलमानच्या गळ्यात लटकणारे बूट कोणी तयार केले आपणास माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 13:32 IST2017-06-22T08:02:53+5:302017-06-22T13:32:53+5:30

सलमान खानचा मोस्टअवेटेड चित्रपट 'ट्यूबलाइट' चे पोस्टर आपण पाहिले असेलच. त्यात सलमानच्या गळ्यात दोन बूट लटकलेले दिसत आहेत. विशेष ...

Tubelight: Who has made Salman's boots ready? | Tubelight : ​सलमानच्या गळ्यात लटकणारे बूट कोणी तयार केले आपणास माहित आहे का?

Tubelight : ​सलमानच्या गळ्यात लटकणारे बूट कोणी तयार केले आपणास माहित आहे का?

मान खानचा मोस्टअवेटेड चित्रपट 'ट्यूबलाइट' चे पोस्टर आपण पाहिले असेलच. त्यात सलमानच्या गळ्यात दोन बूट लटकलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे या बुटांमागची कथा अतिशय रंजक आहे. सलमानचा हा चित्रपट २३ जूनला रिलीज होत असून चित्रपटाबाबतीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 
या बुटांमागची कथा अशी आहे की, जुलै, २०१६ मध्ये मसुरी छावणीत काम करणारे शूमेकर किशन यांना डायरेक्टर कबीर खान यांचा फोन आला. ते म्हणाले, तुम्हाला १९५०-६० च्या दशकात वापरले जायचे तसे बूट बनवायचे आहेत. शूमेकर किशन यांना कबीर खान यांनी जी आॅर्डर दिली त्यामागचे कारणही तसे विशेष आहे. झाले असे की, डायरेक्टर कबीर खान काही दिवसांपूर्वी फिरण्यासाठी मसुरीला गेले होते. त्यावेळी किशन यांच्या दुकानात ते आले होते. त्यांना त्या दुकानात एक सँडल खूप आवडले, ते त्यांनी विकत घेतले होते. त्यानंतर जुलै २०१६ मध्ये किशन यांना कबीर खानने फोन करून ५०-६० दशकातील बुटांसारखे जवळपास ४-५ जोड ८-९ नंबरचे बूट आॅर्डर केली. त्यानंतर त्यांनी १८ जुलैला त्यांना ४-५ चांगल्या डिझाइनचे बूट कुरियरने पाठवले. कुरियर मिळताच कबीर खान आणि सलमान यांनी बुटाचे डिझाइन फायनल केले. त्यानंतर त्यांनी त्या डिझाईनचे ८ नंबरचे १२ जोड शुटिंग सुरू असलेल्या कुल्लु-मनालीमध्ये मागवले.  
 किशनने पेपरमध्ये 'ट्यूबलाइट'च्या पोस्टरमध्ये सलमानच्या गळ्यात बूट पाहिले तर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. किशनच्या मते मी तयार केलेले बूट चित्रपटात वापरले जातील हे मला माहिती होते. पण ते बूट सलमान खान घालणार आहे, हे मला माहिती नव्हते. 



कोण आहेत किशन.. 
- किशनचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून शूमेकिंगचे काम करत आहे. त्यांची चौथी पिढी सध्या या कामात आहे. 
- किशन हे मूळचे मध्यप्रदेशच्या भिंड-मुरैनाचे आहेत. ते ग्वाल्हेर आणि ब्रिटिशकाळात मसुरीला स्थलांतरीत झाले. त्यानंतर त्यांच्या अनेक पिढ्यांनी याठिकाणी हा व्यवसाय केला आहे
- किशन यांचे आडनाव 'मुरेना' त्यांच्या गावामुळे (भिंड-मुरैना) पडले आहे. 
- मसुरी कँटोनमेंटमधील लँडोर बाजारात किशन यांचे शॉप आहे. किशन याठिकाणी डिंगो लेदर शूज तयार करतात.  

Image result for shoemaker-kishan-made-salman-khan-shoes-in-tubelight

Also Read : ​hurry up!!​ ‘ट्यूबलाईट’मधील सलमान खानच्या ‘त्या’ जोड्यांचा होणार लिलाव!

Web Title: Tubelight: Who has made Salman's boots ready?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.