​‘ट्युबलाईट’चा टीजर पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 10:14 IST2017-05-05T04:44:37+5:302017-05-05T10:14:37+5:30

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी सिनेमाच्या टीजरची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा टीजर प्रदर्शित झाला. हा टीजर पाहिल्यानंतर तुम्ही नव्याने सलमानच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.

Tubalite teaser view !! | ​‘ट्युबलाईट’चा टीजर पाहाच!!

​‘ट्युबलाईट’चा टीजर पाहाच!!

मान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी सिनेमाच्या टीजरची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा टीजर प्रदर्शित झाला. हा टीजर पाहिल्यानंतर तुम्ही नव्याने सलमानच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. आकाशवाणीवरील युद्धाच्या बातमीने या टीजरची सुरुवात होते.  महात्मा गांधींचा काळ, युद्धजन्य परिस्थिती, लडाखमधील शाळा हे सर्व बघून मन थक्क होत असतानाच सलमानची दमदार एण्ट्री होते आणि मग सगळ्या टीजरभर सलमानच सलमान दिसतो. ‘बजरंगी भाईजान’मधला साधा भोळा सलमान हा टीजर बघताना आठवल्याशिवाय राहत नाही.



‘यकीन एक ट्युबलाइट की तरह होता है.. देर से जलता है.. पर जब जलता है तो फुल्ल लाइट कर देता है’ हा एक टीजरमधील संवाद लक्ष वेधून घेतो. सोहेल खानने या सिनेमात एका सैनिकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचीही झलक या टीजरमध्ये दिसते.   माटिन रे तंगू हा बालकलाकारही यात दिसतो. 
कबीर खान दिग्दर्शित या सिनेमातमध्ये सलमानसोबतच चिनी अभिनेत्री झू झूसुद्धा झळकणार आहे. तिच्याशिवाय अभिनेता सोहेल खान, बालकलाकार माटिन रे तंगू, दिवंगत अभिनेते ओम पुरीसुद्धा या सिनेमात झळकणार आहेत. मुख्य म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसुद्धा या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. लडाख आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.
‘ट्युबलाईट’शिवाय सलमान सध्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमात बिझी आहे . या चित्रपटात कॅटरिना कैफ त्याच्या अपोझिट दिसणार आहे.‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’ या सिनेमाचा हा सिक्वल आहे.  

Web Title: Tubalite teaser view !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.