या कारणामुळे अन्नपूर्णा देवी राहिल्या सगळ्यांपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:21 PM2018-10-13T13:21:05+5:302018-10-13T13:21:47+5:30

पंडित रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी 21 वर्षं संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले. अन्नूपूर्णा यांच्या संगीताचे अनेक फॅन्स असले तरी त्यांनी गेल्या अनेक काळापासून सार्वजनिक ठिकाणी परफॉर्म केले नव्हते.

The Tragedy And Triumph Of Ravi Shankar’s First Wife Annapurna Devi | या कारणामुळे अन्नपूर्णा देवी राहिल्या सगळ्यांपासून दूर

या कारणामुळे अन्नपूर्णा देवी राहिल्या सगळ्यांपासून दूर

googlenewsNext

शास्त्रीय संगीतातील नामवंत सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे नुकतेच निधन झाले. शनिवार रात्री 3 वाजून 51 मिनिटांनी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी या 92 वर्षांच्या होत्या. वाढत्या वयामुळे त्यांना अनेक आजारांनी ग्रासलेले होते. त्या गेल्या कित्येक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्या सतार वादनाचे अनेक चाहते असून त्यांना त्यांच्या त्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पद्मभुषण हा पुरस्कार देखील मिळाला होता.

अन्नपूर्णा देवी यांचे लग्न संगीत क्षेत्रातील दिग्गज पंडित रवी शंकर यांच्यासोबत झाले होते. त्यांना शुभेंद्र शंकर हा मुलगा होता. पण त्याचे निधन 1992 मध्ये झाले. पंडित रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी 21 वर्षं संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले. अन्नूपूर्णा यांच्या संगीताचे अनेक फॅन्स असले तरी त्यांनी गेल्या अनेक काळापासून सार्वजनिक ठिकाणी परफॉर्म केले नव्हते. त्यांच्या परफॉर्मन्सला रसिक अक्षरशः डोक्यावर घेत असत. पण त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे रवी शंकर खूश नव्हते असे अन्नपूर्णा यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. त्यांना देखील परफॉर्मन्सची तितकीशी आवड नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या साधनेकडे लक्ष केंद्रित केले. त्यांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी परफॉर्म करणार नाही हा निर्णय घेतला. मुलाच्या निधनानंतर तर त्या त्यांच्या मुंबईच्या घरातून देखील खूपच कमी बाहेर पडत असत. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देखील त्या जात नसत केवळ त्यांच्या काही मोजक्या शिष्यांना त्या घरी संगीताचे धडे देत. 

अन्नपूर्णा देवी या मुळच्या मध्य प्रदेशच्या होत्या. मध्य प्रदेशच्या मयहार या गावात त्यांचा 1927 ला जन्म झाला. चार भावंडांमध्ये त्या सगळ्यात लहान होत्या. त्यांना त्यांच्या घरातच संगीताचा वारसा लाभला. त्यांचे वडील उस्ताद अल्लाऊदीन खान हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होते. सेनिया मयहार या गायन घराण्याशी त्यांचा संबंध होता. त्यांच्याकडूनच खूपच लहान वयात अन्नपूर्णा यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. 

अन्नपूर्णा देवी यांनी अनेकांना गायनाचे धडे दिले. आशिष खान (सरोद), अमित भट्टाचार्य (सरोद), बहाद्दूर खान (सरोद), बसंत काबरा (सरोद) हरिप्रसाद चौरसिया (बासरी) यांसारखे संगीत क्षेतातील दिग्गज हे अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य होते.

Web Title: The Tragedy And Triumph Of Ravi Shankar’s First Wife Annapurna Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.