मनोज वाजपेयी बनला ट्रॅफिक पोलिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 19:10 IST2016-05-05T13:40:49+5:302016-05-05T19:10:49+5:30
‘अलिगड’नंतर मनोज वाजपेयी एका ज्वलंत विषयावरील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘ट्रफिक’. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मनोज वाजपेयी ...

मनोज वाजपेयी बनला ट्रॅफिक पोलिस
‘ लिगड’नंतर मनोज वाजपेयी एका ज्वलंत विषयावरील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘ट्रफिक’. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मनोज वाजपेयी मुंबईच्या रस्त्यावर एक दिवसासाठी ट्रॅफिक पोलिस बनला आणि विशेष म्हणजे त्याने हे कर्तव्य चोखपणे पारही पाडले. मनोजला अशाप्रकारे ट्रॅफिक पोलिसच्या भूमिकेत पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. ट्रॅफिकमधून मार्ग काढत एका जीवाला जीवदान देण्यासाठीची धडपड ट्रफिक’या सिनेमात दाखवली आहे. या चित्रपटात मनोजसह जिमी शेरगील व दिव्या दत्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. येत्या ६ मे रोजी म्हणजे उद्याच हा चित्रपट रिलीज होतो आहे.