आव्हानांना थेट भिडायला आवडते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:36 IST2016-02-12T13:36:45+5:302016-02-12T06:36:45+5:30
अॅक्शन, स्टंट, अॅडव्हेंचरची मला प्रचंड आवड आहे. ही आवडच मला आयुष्यातील सर्व आव्हानांना थेट भिडायची प्रेरणा देते. हेच कारण ...
.jpg)
आव्हानांना थेट भिडायला आवडते!
धाडसाचे धडे देणारा शो
कुठल्याही भीतीला सामोरे जाण्याचे धाडस ‘खतरो के खिलाडी’हा शो शिकवतो. आयुष्यात मी हार मानेल याची मला सगळ्यात जास्त भीती वाटते. मला कधीच हार मानायची नाही. जोखीम घेण्यास टाळाटाळ करायची नाही. याशिवाय मला कशाचीच भीती नाही. खेळात आणि जीवनात चढ-उताराचे क्षण येतच असतात; मात्र त्यामधून वाट शोधण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. यशापयाशापेक्षा प्रयत्न करण्याला महत्त्व आहे. ते प्रयत्न करणे मी कधी सोडू नये एवढीच माझी इच्छा आहे आणि हाच संदेश मी या शोच्या निमित्ताने देत आहे.
मी फार गंभीर माणूस नाही
मित्रांसोबत गंमतीजमती करायला मला खूप आवडते. त्यांची टर उडवणे, चेष्टा करण्याचा माझा स्वभाव आहे. हा शो होस्ट करताना तुम्हाला माझा तो स्वभाव दिसेलच. स्पर्धकांचे टेंशन कमी करण्यासाठी मी त्यांच्याची विनोद करतो, त्यांना हसवतो. ज्याला आपण ‘टांग खिंचना’ म्हणतो ते शोमध्ये भरपूर पाहायला मिळेल.
होस्टिंग एक चॅलेंज
रिअॅलिटी शोचा होस्ट होणे माझ्यासाठी एक चॅलेंज होते. मी त्यात यशस्वी होण्यासाठीच ते स्वीकारले होते. सुरुवातीला मी थोडा नर्व्हस होतो कारण मला येथे स्वत:चीच भूमिका करायची होती. सर्वोत्कृष्ट अर्जुन कपूर मला सादर करायचा होता. मनोरंजनाबरोबरच शोमधील स्पर्धकांना धीर देणे, गरज पडल्यास थोडं रागावणे अशी जबाबदारी माझ्यावर होती. त्यांचा एक मार्गदर्शक आणि मित्र अशा दुहेरी भूमिका मला अर्जुन कपूर म्हणून पार पाडायच्या असल्यामुळे माझ्यासमोर ते खूप मोठे चॅलेंज होते, असे अर्जुनने सांगितले.
अर्जेंटिनातील शूटिंगचा अनुभव भन्नाट
या शोचे शूटिंग आम्ही अर्जेंटिनात केले. तेथील अनुभव फारच भन्नाट होते. तेथील एका एअर ट्रायचा उपयोग आम्ही ज्या पद्धतीने स्टंटसाठी केला ते तर मजेशीर होते. स्पर्धकांनीही येथील मोसम मस्त एन्जॉय केला. अर्जेंटिनात अशा शोच्या शूटिंगसाठी चांगले लोकेशन्स आहेत.
नटसम्राट पाहायचाय!
मराठी चित्रपटसृष्टीची आता सर्वत्र चर्चा आहे. येथे होणारे प्रयोग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. बॉलिवूडमध्ये ‘नटसम्राट’बाबतही खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. अनेक जणांनी मला तो सिनेमा पाहायलाच पाहिजे असे सांगितले आहे. त्यामुळे मलासुद्धा तो पाहण्याची इच्छा आहे. मी पंजाबी जरी असलो तरी मनाने मुंबईकर आहे. मराठी भाषा मला कळते.