Toilet Ek Prem Katha : अक्षयकुमारने शेअर केले त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 14:30 IST2017-03-31T09:00:40+5:302017-03-31T14:30:40+5:30

Toilet Ek Prem Katha : अक्षयकुमारने शेअर केले त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर!
अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांचा बहुचर्चित आगामी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टर अतिशय सुंदर असून, एकप्रकारे त्यातून संदेश देण्याचाच प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर पोस्टर बघून प्रेक्षकांची आतुरता आणखी वाढली, हेही तेवढेच खरे आहे.
श्री नारायण सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या अक्षय आणि ‘दम लगा के हैस्सा’ या चित्रपटातील वजनदार अभिनेत्री भूमी पेडणेकर पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. पोस्टरमध्ये अक्षय आणि भूमी नवरा-नवरीच्या वेशभूषेत दिसत आहेत. त्याशिवाय पोस्टरमध्ये स्वच्छता अभियानाविषयीचा संदेशही देण्यात आला आहे.
चित्रपटाचे पहिले-वहिले पोस्टर खुद्द अक्षयनेच ट्विटरवर शेअर केले असून, त्याखाली लिहिले की, ११ आॅगस्ट २०१७ रोजी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा अनोखी असून, स्वच्छ स्वातंत्र्यासाठी तयार रहा.
उत्तर प्रदेश आणि मथुरेच्या बरसानामध्ये गेल्या नोव्हेंबर २०१६ पासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली होती. चित्रपटाची कथा ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर आहे. यूपीच्या बरसाना, नंदगावसह मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथेही चित्रपटाचा काही भाग शूट करण्यात आला आहे.
दरम्यान ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा सिनेमा सुरुवातीला २ जून रोजी रिलीज होणार होता; परंतु आता त्याची रिलीज डेट बदलण्यात आली असून, ११ आॅगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. त्याबाबतचा उल्लेखही या नव्या पोस्टरवर केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र याच दिवशी इम्तियाज अली यांचा ‘द रिंग’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरूख आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉक्स आॅफिसवर दोन बड्या स्टार्सची टक्कर बघावयास मिळेल, हे नक्की.
दरम्यान, आतापर्यंतचा इतिहास पाहता जेव्हा-जेव्हा शाहरूख आणि अक्षयकुमार यांचा सामना झाला तेव्हा शाहरूखने बाजी मारली आहे. त्यामुळे यावेळेस शंभर कोटींच्या क्लबमध्ये कोण स्थान मिळवणार हे बघणे मजेशीर ठरेल. कारण दोन्ही चित्रपटांच्या कथा भारदस्त असल्याने बॉक्स आॅफिसवर दोघांचा जबरदस्त टसन बघावयास मिळेल, यात शंका नाही.

Pleased to share, @ToiletTheFilm an unusual love story will be with you on 11th Aug, 2017. Tayyar ho jayye Swachch Azaadi ke liye! pic.twitter.com/EEb5bOySu0
— Akshay Kumar (@akshaykumar) March 30, 2017 ">http://}}}}Pleased to share, @ToiletTheFilm an unusual love story will be with you on 11th Aug, 2017. Tayyar ho jayye Swachch Azaadi ke liye! pic.twitter.com/EEb5bOySu0
— Akshay Kumar (@akshaykumar) March 30, 2017