​दंगलचे टायटल सॉग; दिलेर महेंदीचा आवाजात नवी उर्जा भरणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 20:45 IST2016-12-09T20:45:45+5:302016-12-09T20:45:45+5:30

aamir khan dangal title track out ; ‘दंगल’चे टायटल साँग प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर महेंदी याने गायले आहे. ‘दंगल’चे हे प्रमुख गाणे नवी उर्जा प्रदाण करणारे आहे. हे गाणे हरयाणवी भाषेतील असून यात काही डॉयलॉगही आहेत.

Title song of the tragedy; New energy-packed sound | ​दंगलचे टायटल सॉग; दिलेर महेंदीचा आवाजात नवी उर्जा भरणारे

​दंगलचे टायटल सॉग; दिलेर महेंदीचा आवाजात नवी उर्जा भरणारे

ong>आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘दंगल’ या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस उरले असतानाच ‘दंगल’चे टायटल साँग रिलीज करण्यात आले आहे. मात्र आमिरने यातही उत्सुकता कायम राखली आहे. ‘दंगल’चे टायटल साँग प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर महेंदी याने गायले आहे.

‘दंगल’चे हे प्रमुख गाणे नवी उर्जा प्रदाण करणारे आहे. हे गाणे हरयाणवी भाषेतील असून यात काही डॉयलॉगही आहेत. ‘मुलीला मुलाशी कुस्ती करायला लावणार.. तुला तुझी इज्जर प्यारी नसेल पण आम्हाला आमची इज्जत प्यारी आहे...’ असे संवाद यात आहेत. ‘तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल..’ असे बोल असणाºया या गाण्याला खणखणीत आवाजाचे गायक दलेर मेहंदी यांनी गायले आहे.  विशेष म्हणजे व्हिडिओशेवटी तरुणपणातील महावीर सिंगच्या भूमिकेतीळ आमिर खान कुश्ती खेळत समोरच्याला चितपट करताना दिसतो. त्यामुळे गाण्याचे शब्द, त्याची चाल आणि एकंदर दलेर मेहंदी यांचा अवाज, पार्श्वभागात मिळणारा ढोलांचा ठेका या गाण्याच्या जमेच्या बाजू आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून उतरलेल्या या प्रोत्साहनपर गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केले आहे.

"Bhed ki hahakar ke badle, sher ki ek dahaad hai pyaare Dangal Dangal". #Dangal title track video out now: https://t.co/iSKyv9t5m5— UTV Motion Pictures (@utvfilms) December 9, 2016 ">http://

}}}}

या गाण्यातून बºयाच गोष्टी दाखविण्यात आल्या असल्या तरी चित्रपटातील प्रमुख बाजू त्याने अद्याप लपवून ठेवल्या असल्याचे मानले जात आहे. दंगचे प्रमोशन स्पेशली सोशल मीडियाहून केले जात आहे. मात्र अद्याप आमिर प्रमोशनसाठी टीव्हीवर दिसला नाही. मात्र ‘काफी विद करण’मध्ये आमिर लवकरच हजेरी लावणार असल्याचे समजते. यापूर्वी रिलीज करण्यात आलेल्या ‘दंगल’च्या गाण्यांचा चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. दंगलचे इतर गाणी संपल्यावर याच गाण्याचा आवाज येत असल्याने चाहत्यांना या गाण्याची प्रतिक्षा होती ती आता पूर्ण झाली असल्याचे मानले जात आहे. 


Web Title: Title song of the tragedy; New energy-packed sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.