टायरन वुडलीने ‘या’ अंदाजात मानले सलमान खानचे आभार, पहा स्पेशल व्हिडीओ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 18:58 IST2017-07-30T13:25:46+5:302017-07-30T18:58:33+5:30

टायरन वुडली सलमानच्या असा काही प्रेमात पडला की, त्याचे आभार मानण्यासाठी त्याने एक स्पेशल ट्विट केले.

Tired of Salman Khan, considered by 'Tyraon Woodley' as an antidote, watch special video! | टायरन वुडलीने ‘या’ अंदाजात मानले सलमान खानचे आभार, पहा स्पेशल व्हिडीओ !

टायरन वुडलीने ‘या’ अंदाजात मानले सलमान खानचे आभार, पहा स्पेशल व्हिडीओ !

लिवूडचा दबंग सलमान खान हे असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्याला पाहताच क्षणी त्याच्या कोणीही प्रेमात पडतो. असेच काहीसे टायरन वुडली याच्याबाबत झाले आहे. काही दिवसांपूर्वी टायरन वुडली भारतात आला होता. यावेळी त्याने सलमानसोबत काहीकाळ व्यतित केला होता. त्यानंतर तो सलमानच्या असा काही प्रेमात पडला की, त्याचे आभार मानण्यासाठी त्याने एक स्पेशल ट्विट केले. सलमाननेदेखील त्याच्या या स्पेशल ट्विटरला रिट्विट करीत उत्तर दिले. वास्तविक सलमान मैत्री निभावण्यासाठी ओळखला जातो, अशात सलमानने टायरनच्या स्पेशल ट्विटला उत्तर दिले नसते तरच नवल. 

सलमानने टायरनसोबतचा एक व्हिडीओ शेअर करताना टायरनला टॅग केला. या व्हिडीओचे वैशिष्ट्ये म्हणजे टायरन सलमानचा उल्लेख करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. सलमानने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘माझ्यासाठी हे शब्द वापरल्याबद्दल आभार, आजच्या तुझ्या फाइटसाठी गुड लक.. गॉड ब्लेस यू!’ टायरन वुडली याने सलमानसोबत ‘सुलतान’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटात त्याने एका रेस्लरची भूमिका साकारली आहे. }}}} ">Thank u for all the kind words Tyron Woodley . Really appreciate it best of luck for ur fight today god speed god bless . @TWooodleypic.twitter.com/W1fMQFd6Ss— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 29, 2017दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सलमान मोरक्को येथून शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतला आहे. मोरक्को येथे त्याने त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाची शूटिंग केली. आता तो ‘बिग बॉस’च्या ११व्या सीजनचा प्रोमो शूट करण्याच्या कामात व्यस्त आहे. वास्तविक दरवर्षी बिग बॉस आॅक्टोबरमध्ये सुरू होते. परंतु यावेळी सप्टेंबरपासूनच सुरू करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. सध्या सलमान त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये प्रचंड व्यस्त आहे. 

Web Title: Tired of Salman Khan, considered by 'Tyraon Woodley' as an antidote, watch special video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.