Tiktok Controversy: फैजलनंतर आता आमिर सिद्दीकीचंही 38 लाख फॉलोव्हर्स असलेलं TikTok अकाऊंट सस्पेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 07:47 PM2020-05-25T19:47:38+5:302020-05-25T19:51:59+5:30

युट्यूब व्हर्सेस टिकटॉक या सोशल मीडियावरील वॉरमुळे आमिर सिद्दीकी चर्चेत आला होता.

Tiktok Controversy: Aamir Siddiqui's TikTok account suspended TJL | Tiktok Controversy: फैजलनंतर आता आमिर सिद्दीकीचंही 38 लाख फॉलोव्हर्स असलेलं TikTok अकाऊंट सस्पेंड

Tiktok Controversy: फैजलनंतर आता आमिर सिद्दीकीचंही 38 लाख फॉलोव्हर्स असलेलं TikTok अकाऊंट सस्पेंड

googlenewsNext

टिकटॉकवरील वाद काही संपायचं नाव घेत नाही आहे. एकीकडे काही जण टिकटॉक बंद करायची मागणी करत आहेत तर काही जण सपोर्ट करताना दिसत आहेत. यादरम्यान फैजल सिद्दीकीचे टिकटॉक अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते आणि त्यानंतर आता त्याचा भाऊ आमिर सिद्दीकीचेदेखील टिकटॉक अकाउंड सस्पेंड करण्यात आले आहे. आमिर सिद्दीकीचे टिकटॉक अकाउंट सस्पेंड होण्यामागे कास्टिंग डिरेक्टर नूर सिद्दीकी यांची याचिकेचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

खरेतर युट्यूब आणि टिकटॉक असे महायुद्ध भारतीय लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी आणि टिकटॉक स्टार आमिरी सिद्दीकीमध्ये रंगले होते. त्यामुळेच आमिर सिद्दीकी चर्चेत आला होता. आता त्याचे टिकटॉक अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. त्याचे 3.8 मिलियन म्हणजेच 38 लाख फॉलोव्हर्स आहेत. त्याच्या व्हिडिओंना खूप पसंती मिळत होती आणि तो हे व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही शेअर करायचा. इंस्टाग्रामवर देखील त्याचे पाच लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. आमिरने युट्यूब कम्युनिटीच्या विरोधात एक व्हिडिओ बनवला होता ज्यामुळे तो चर्चेत आला होता.


तर कास्टिंग डिरेक्टर नूर सिद्दीकीने आमिर सिद्दीकीच्या विरोधात धमकीवाले मेसेज पाठवल्याची तक्रार दाखल केली होती. नूर सिद्दीकीचा वकील अली खासिफ यांनी स्पॉटबॉयला या प्रकरणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, माझ्या क्लायंटने कायदेशीर कारवाई केल्यामुळे आमिर सिद्दीकीचे टिकटॉक अकाउंट सस्पेंड करण्यात आले. माझे क्लायंट नूर यांनी टिकटॉककडे तक्रार केली होती. त्याच्यामुळे टिकटॉकचे खूप मोठे नुकसान झाले आहे. टिकटॉकची रेटिंगदेखील घसरली आहे.


सर्वात आधी टिकटॉक व्हर्सेस युट्यूब हे प्रकरण समोर आले. त्यानंतर फैजल सिद्दीकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात त्यावर अॅसिड हल्ल्याला प्रोत्साहन देण्याचा आरोप लागला. त्यानंतर सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले ज्यांच्यावर लैंगिक शोषण व प्राण्यांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. त्यानंतर टिकटॉकने एक पोस्ट करीत व्हिडिओसाठी नियमावली बनवली आहे.

Web Title: Tiktok Controversy: Aamir Siddiqui's TikTok account suspended TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.