Are U Coming! टायगर श्रॉफचा स्पेशल व्हॅलेन्टाईन व्हिडीओ एकदा पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 11:57 AM2019-02-06T11:57:22+5:302019-02-06T11:58:10+5:30

आपल्या डान्स आणि अ‍ॅक्शनने चाहत्यांना वेड लावणारा टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सज्ज झालाय. होय, व्हॅलेन्टाईन सीझनमध्ये टायगरचा एक म्युझिक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धूम करतोय.

Tiger Shroff's special Valentine video Are U Coming to fans goes viral! | Are U Coming! टायगर श्रॉफचा स्पेशल व्हॅलेन्टाईन व्हिडीओ एकदा पाहाच!!

Are U Coming! टायगर श्रॉफचा स्पेशल व्हॅलेन्टाईन व्हिडीओ एकदा पाहाच!!

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या टायगर ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो अनन्या पांडे व तारा सुतारियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

आपल्या डान्स आणि अ‍ॅक्शनने चाहत्यांना वेड लावणारा टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सज्ज झालाय. होय, व्हॅलेन्टाईन सीझनमध्ये टायगरचा एक म्युझिक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धूम करतोय. ‘आर यू कमिंग’ नामक या व्हिडिओवर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडताहेत. इतक्या की, केवळ तीन दिवसांत आठ कोटींवर लोकांनी हा व्हिडीओ बघितलाय.
 डान्स व्हिडिओतील टायगरची प्रत्येक ‘डान्स मुव्ह’ निव्वळ खल्लास करणारी आहे. व्हिडिओतील गाणे सचिन जिगरने संगीतबद्ध केले असून बेनी दयालने गायले आहे. रेमो डिसूजाने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. तेव्हा पाहाच...

सध्या टायगर ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो अनन्या पांडे व तारा सुतारियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय त्याने ‘बागी 3’चीही घोषणा केलीय. मार्च २०२० मध्ये ‘बागी 3’ प्रदर्शित होतोय. ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये होती. तर ‘बागी 2’मध्ये टायगर दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसला होता. अर्थात ‘बागी 3’मध्ये टायगरच्या अपोझिट कुणाचा वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या आगामी चित्रपटासाठी टायगर वेगवेगळे स्टंट शिकतो आहे. आधीच्या दोन भागांपेक्षाही थरारक असे अ‍ॅॅक्शन स्टंट यात दिसणार आहेत. हे स्टंट डिझाईन करण्यासाठी भारत आणि विदेशातील स्टंट डायरेक्टर्सची मदत घेतली जात आहे. ‘बागी 2’ने यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत स्थान कमावले होते. त्यामुळे ‘बागी 3’कडून चाहत्यांना विशेष अपेक्षा आहेत.  

Web Title: Tiger Shroff's special Valentine video Are U Coming to fans goes viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.