टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकेल’चा फर्स्ट लूक आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 04:32 AM2017-06-01T04:32:52+5:302017-06-01T10:02:52+5:30

टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकेल’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे फर्स्ट लूक आऊट झालेय. हा चित्रपट बॉलिवूडचा पहिला डान्स अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचा ...

Tiger Shroff's 'Munna Michael' first look! | टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकेल’चा फर्स्ट लूक आला!

टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकेल’चा फर्स्ट लूक आला!

googlenewsNext
यगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकेल’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे फर्स्ट लूक आऊट झालेय. हा चित्रपट बॉलिवूडचा पहिला डान्स अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचा दावा केला जात आहे. टायगर श्रॉफसोबतच नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. नवाजुद्दीन यात एका आगळ्या-वेगळ्या अवतारात बघायला मिळणार असल्याचे कळते.

{{{{twitter_post_id####}}}}


नवाजच्या चाहत्यांसाठी हे कुठल्या आश्चर्यापेक्षा कमी असणार नाही. ‘मुन्ना मायकेल’च्या निमित्ताने टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दिग्दर्शक शब्बीर खानसोबत काम करताना दिसणार आहे. यापूर्वी शब्बीर खानच्या ‘हिरोपंती’ आणि  ‘बागी’ या चित्रपटात टायगर लीड रोलमध्ये होता. इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी निर्मित हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाद्वारे निधी अग्रवाल हा नवा चेहरा बॉलिवूडमध्ये येणार आहे. 

ALSO READ : ​टायगर श्रॉफ घेणार सिल्वस्टर स्टेलॉनची जागा!!

 डान्सिंग स्टार होण्यासाठी धडपडणाºया  मुन्नाची ही कथा असून त्याला मायकेल जॅक्सनप्रमाणे डान्स करता यावा असे वाटत असते. मायकेल जॅक्सनसारखे  माझेही नाव व्हावे असे त्याचे स्वप्न असते. हा चित्रपट टायगरच्या करिअरसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. टायगरचा मागील चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट्ट’ बॉक्स आॅफिसवर तग धरू न शकल्याने टायगर कमालीचा निराश झाला होता.  ‘मुन्ना मायकेल’शिवाय टायगर ‘बागी2’ मध्ये दिसणार आहे. एवढेच नव्हे ती लवकरच हॉलिवूडचा अ‍ॅक्शनपट ‘रॅम्बो’च्या इंडियन रिमेकमध्येही टायगर बघावयास मिळणार आहे. ‘रॅम्बो’या ‘आयकॉनिक’ हॉलिवूडपटात सिल्वस्टर स्टेलॉन होता. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये टायगर स्टेलॉनची जागा घेणार आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ  आनंद हा रिमेक घेऊन येणार असल्याचे कळतेय. एम. कॅपिटल वेंचर, ओरिजनल एंटरटेनमेंट, इपेक्ट फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंद पिक्चर्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असेल.

Web Title: Tiger Shroff's 'Munna Michael' first look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.