​टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी बनली ‘सुपरगर्ल’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 15:58 IST2017-05-12T10:22:51+5:302017-05-12T15:58:33+5:30

होय, दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिची पोझ एका सुपरगर्ल सारखी आहे.

Tiger Shroff's 'Girlfriend' Patni became 'SuperGirl' !! | ​टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी बनली ‘सुपरगर्ल’!!

​टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी बनली ‘सुपरगर्ल’!!

यगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनी सुंदर आहेच शिवाय प्रतिभावानही आहे. तिचे मादक सौंदर्य आणि तेवढ्याच मादक अदा चाहत्यांना वेड लावतात. काही दिवसांपूर्वी दिशा एका मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसली होती. यातील तिचा हॉट अंदाज बघण्यासारखा होता. आता तिचा असाच एक हॉट अंदाज तुम्ही पाहू शकणार आहोत. होय, दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिची पोझ एका सुपरगर्ल सारखी आहे. आता या व्हिडिओत ती तिचा बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफला तर कॉपी करतेय की काय, हे आम्हाला ठाऊक नाही. कारण  ‘ अ फ्लार्इंंग जट’ याचित्रपटात टायगर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला होता. अर्थात हा चित्रपट दणकून आपटला होता. (खरे तर हे ठाऊक असताना दिशाने अशी पोझ देऊन टायगरच्या जखमांवर मीठ चोळायला नको आहे.) आता दिशाच्या मनात काय आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण हा व्हिडिओ तुम्ही बघायला हवा. कदाचित दिशा व्हॅकेशन एन्जॉय करतेय, असे यावरून वाटतेय.
 


 तूर्तास दिशा स्वत:चे काम स्वत: पाहते आहे. याचे कारण पीआर टीमसोबतचे तिचे भांडण. होय, दिशाने तिच्या पीआर टीमसोबतचे संबंध पूर्णपणे तोडले आहेत. ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’नंतर दिशाला एकही चित्रपट मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी नाही म्हणायला तिला एका चित्रपटाची आॅफर मिळाली होती. सुशांतसिंह राजपूतसोबतचा सिनेमा तिला आॅफर झाला होता. पण दिशाने या चित्रपटाला नकार दिला. ही बातमी दिशाच्या टीमने नाही तर तिने खुद्द शेअर केलीय. एकंदर काय तर दिशा आता स्वत:च स्वत:ची पब्लिसिटी करतेय. 

Web Title: Tiger Shroff's 'Girlfriend' Patni became 'SuperGirl' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.