टायगर श्रॉफच्या ‘बागी2’चा फर्स्ट लूक आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 12:55 IST2017-05-02T07:25:26+5:302017-05-02T12:55:26+5:30
टायगर श्रॉफ सध्या ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटात बिझी आहे. यानंतर तो ‘स्टुडंट आॅफ दी इअर’चे शूटींग सुरु करणार आहे.पण ...

टायगर श्रॉफच्या ‘बागी2’चा फर्स्ट लूक आऊट !
ट यगर श्रॉफ सध्या ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटात बिझी आहे. यानंतर तो ‘स्टुडंट आॅफ दी इअर’चे शूटींग सुरु करणार आहे.पण इतकेच नाही, तर टायगरचा आणखी एक चित्रपट येत्या काळात आपल्याला बघायला मिळणार आहे. होय, ‘बागी2’. आज ‘बागी2’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचे पोस्टर टायगरने आपल्या twitter अकाऊंटवर शेअर केले आहे. यात टायगर पाठमोरा दिसतोय. साहजिकच टायगरचा चेहरा पाहण्यासाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक मात्र खरे, ‘बागी2’मध्ये टायगरचे लूक एकदम हटके आहे. या पोस्टरमध्ये टायगरचे ‘मिल्ट्री कट’ हेअरस्टाईल, डाव्या दंडाला बांधलेला लाल कपडा आणि उजव्या हातात बंदूक सगळेच काही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.
![]()
‘बागी2’ हा चित्रपट पुढील वर्षी २७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बागी2’ हा गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा सीक्वल आहे. यात टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. यातील अॅक्शन दृश्ये प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ‘बागी’ हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता. ‘बागी2’ अहमद खान डायरेक्ट करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या तयारीसाठी टायगर हाँगकाँगला जाणार असल्याचे कळतेय. याठिकाणी तो इंटरनॅशनल स्टंट कोरिओग्राफर्सकडून खास ट्रेनिंग घेणार आहे. ‘बागी2’मध्ये टायगरची दमदार अॅक्शन दिसणार हे फर्स्ट लूकवरून दिसते आहेच. पण यातील अॅक्शन सीन्स प्रीक्वलपेक्षा एकदम वेगळे आणि हटके असावेत, अशी अहमद खान यांची इच्छा आहे. ‘बागी’मध्ये टायगरने अनेक डेडली स्टंट आणि मार्शल आर्ट केले होते.