टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा टीझर प्रदर्शित, अभिनेता दिसला दमदार अॅक्शन करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:39 IST2025-08-11T15:37:13+5:302025-08-11T15:39:39+5:30
Baaghi 4 Movie : 'बागी ४'चा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. चाहत्यांना चित्रपटाचा टीझर खूप आवडला आहे.

टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा टीझर प्रदर्शित, अभिनेता दिसला दमदार अॅक्शन करताना
'बागी ४' (Baaghi 4 Movie)चा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ (Tiger Shroff) मुख्य भूमिकेत आहे. चाहत्यांना चित्रपटाचा टीझर खूप आवडला आहे. या टीझरमध्ये बरीच रक्तपात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफ व्यतिरिक्त, या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सोनम बाजवा (Sonam Bajwa) सारखे कलाकार दिसणार आहेत. याशिवाय माजी मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू (Harnaaj Kaur Sandhu) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
'बागी ४' चित्रपटाचा टीझर १ मिनिट ४९ सेकंदांचा आहे. टीझरच्या सुरुवातीला आपल्याला टायगर, संजय, हरनाज आणि सोनमचा भावनिक अवतारात दिसत आहेत. पण जसजसा टीझर पुढे सरकतो तसतसा तो इंटेस होत जातो. चित्रपटात टायगर आणि संजय दत्त अशा अवतारात दिसले आहेत जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. दोघेही एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत आणि रक्तरंजित अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहे. त्यांचा लूकही तितकाच डेंजरस आहे. टीझरमध्ये संजय दत्त हातात मोठा चाकू घेऊन धावताना आणि जळालेल्या हाताने सिगार पेटवताना दिसला. त्याचबरोबर सोनम बाजवा आणि हरनाज कौर संधू देखील अॅक्शन सीक्वेंस करताना दिसल्या. टीझरमध्ये टायगरचे संवाद दमदार आहेत. 'कुंडी खड़काऊं या सीधा अंदर आऊं', 'हर आशिक एक विलेन है' यासारखे संवाद जबरदस्त आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
चाहत्यांना 'बागी ४' चित्रपटाचा टीझर खूप आवडला आहे. एका युजरने लिहिले की, बागी ४ सह थिएटर स्टेडियममध्ये बदलणार आहे. त्याच वेळी, दुसऱ्या युजरने लिहिले, धोकादायक लूक, वेगळ्या पातळीचा रक्तपात पाहिला जाणार आहे. हा वर्षाचा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल. आणखी नेटकऱ्याने लिहिले, हा गेम चेंजर ठरणार आहे. बागी ४ साठी शब्दच नाहीत.
'बागी ४'बद्दल
'बागी ४'ची निर्मिती साजिद नादियाडवाला यांनी केली आहे. चित्रपटाच्या टीझरला सीबीएफसीकडून ए सर्टिफिकेट मिळाले आहे. चित्रपटात अॅक्शनसोबत एक प्रेमकथा देखील पाहायला मिळेल. ए हर्ष यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.