​डिप्रेशनमध्ये गेला होता टायगर श्रॉफ ! हे होते कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 13:32 IST2017-03-30T08:02:55+5:302017-03-30T13:32:55+5:30

डिप्रेशन हा सध्या कॉमन आजार झाला आहे. बॉलिवूडचे म्हणाल, तर बॉलिवूड आणि डिप्रेशनचे जवळचे नाते आहे. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी ...

Tiger Shroff went in the Depression! Because it was !! | ​डिप्रेशनमध्ये गेला होता टायगर श्रॉफ ! हे होते कारण!!

​डिप्रेशनमध्ये गेला होता टायगर श्रॉफ ! हे होते कारण!!

प्रेशन हा सध्या कॉमन आजार झाला आहे. बॉलिवूडचे म्हणाल, तर बॉलिवूड आणि डिप्रेशनचे जवळचे नाते आहे. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळे असले तरी बॉलिवूडमध्ये टिकून राहणे सोपे नाही. इथल्या स्पर्धेला तोंड देणे सोपे नाही. इथला व्यवहार पचवणे सोपे नाही. त्यामुळेच अनेक बॉलिवूड कलाकार डिप्रेशनचे शिकार होतात. अलीकडच्या काळात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण ही डिप्रेशनची शिकार झालेली आपण पाहिली. (रणबीर कपूरसोबतच्या बे्रकअपनंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. यातून बाहेर यायला तिला बराच वेळ लागला. अर्थात मेडिकल ट्रिटमेंट आणि कुटुंबाचे प्रेम याच्या मदतीने ती यातून बाहेर पडली.) तिच्या या डिप्रेशनची बरीच चर्चा झाली. दीपिकानेही जाहिरपणे ती दीर्घकाळ डिप्रेशनमध्ये होती, हे मान्य केले. दीपिकानंतर मध्यंतरी हृतिक रोशन डिप्रेशनमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आणि आता अभिनेता टायगर श्रॉफ हा सुद्धा डिप्रेशनमधून गेल्याचे उघड झालेय.

ALSO READ : राम गोपाल वर्मा यांनी टायगर श्रॉफला म्हटले ‘बिकनी बेब’!

एका मुलाखतीत टायगरने स्वत: हे सांगितले. तो म्हणाला, काही महिन्यांपूर्वी मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. ‘बागी’ने माझ्या करिअरला चांगला वेग दिला होता. मी त्यामुळे आनंदात होतो. माझ्यासारख्या न्यूकमरसाठी यापेक्षा चांगली गोष्ट नव्हतीच. पण यानंतर आलेल्या ‘अ फ्लार्इंग जट्ट’ने माझ्या आनंदावर पाणी फेरले. मी चित्रपटासाठी इतकी मेहनत केली आणि लोकांना हा चित्रपट जराही आवडला नाही, हे पाहून मी डिप्रेशनमध्ये गेलो. 
या डिप्रेशनमधून टायगर कसा बाहेर आला, तर स्वत:च्या आत्मविश्वासाच्या जोरावर. तो याबद्दल सांगतो, ‘मुन्ना मायकल’चे शूटींग सुरू केले, तेव्हाही मी डिप्रेशनमध्येच होतो. याच स्थितीत मी शूटींग सुरु ठेवले. शूटींगचे पहिले शूेड्यूल संपल्यावर अचानक मला साक्षात्कार झाला. गमावलेला आत्मविश्वास परत आला आणि हळूहळू मी डिप्रेशनमधून बाहेर पडलो.

Web Title: Tiger Shroff went in the Depression! Because it was !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.