वरूण धवन घेतोय टायगर श्रॉफच्या ट्रेनरकडून प्रशिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 19:51 IST2017-01-13T19:51:09+5:302017-01-13T19:51:09+5:30

अभिनेता वरूण धवन याच्याकडे त्याचा ट्रेनर नाही का? असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. पण, वरूणला जरासं वेगळं प्रशिक्षण ...

Tiger Shroff trainer taking training from Varun Dhawan! | वरूण धवन घेतोय टायगर श्रॉफच्या ट्रेनरकडून प्रशिक्षण!

वरूण धवन घेतोय टायगर श्रॉफच्या ट्रेनरकडून प्रशिक्षण!

िनेता वरूण धवन याच्याकडे त्याचा ट्रेनर नाही का? असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. पण, वरूणला जरासं वेगळं प्रशिक्षण घ्यायचं असल्याने तो आता त्याच्या तब्येतीबद्दल जास्तच कॉन्शियस झाल्याचे कळतेय. त्याचं झालं असं की, त्याच्या आगामी ‘जुडवा २’ या चित्रपटासाठी टायगर श्रॉफ आणि सोनाक्षी सिन्हा यांचे ट्रेनर कुलदीप शशी यांच्याकडून विशेष ट्रेनिंग घ्यायला सुरूवात केली आहे. ‘जुडवा २’ या चित्रपटात त्याला दोन व्यक्तीरेखा साकारायच्या असल्याने तो मार्शल आर्टस् आणि पार्कर यांचे धडे गिरवत आहे.

‘अकिरा’ आणि ‘बागी’ या चित्रपटांसाठी सोनाक्षी सिन्हा आणि टायगर श्रॉफ यांनी कुलदीप यांच्याकडे ट्रेनिंग घेतली होती. मार्शल आर्टस् ट्रेनर कुलदीप यांची शिफारस साजिद नादियाडवाला यांच्याकडून करण्यात आलेली आहे. ‘बागी’ चित्रपटात ज्याप्रकारे त्या ट्रेनरनी स्टंट करवून घेतले त्यावरून प्रभावित होऊन साजिदने ‘जुडवा २’ साठी देखील त्यांना घ्यायचे ठरवले. वरूण जवळपास एका आठवड्यासाठी बँकॉक येथे मार्शल आर्ट्सचे धडे घ्यायला गेला आहे. 

२०१४ मध्ये डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली रिलीज झालेल्या ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटानंतर वरूण आता पुन्हा एकदा ‘जुडवा’च्या सिक्वेलसाठी सज्ज झाला आहे. एप्रिल महिन्यात चित्रपटाची शूटिंग सुरू होणार असल्याचे कळतेय. वरूणसोबत मुख्य भूमिकेत जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या असतील.

Web Title: Tiger Shroff trainer taking training from Varun Dhawan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.