​‘बागी2’साठी टायगर श्रॉफ करणार असे काही की, जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 06:32 AM2017-09-18T06:32:26+5:302017-09-18T12:12:40+5:30

टायगर श्रॉफचे अलीकडे आलेले दोन्ही सिनेमे (द फ्लार्इंग जट्ट व मुन्ना मायकेल ) बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले. पण म्हणून निराश ...

Tiger Shroff for 'Baghi2' is something that, knowingly push you too! | ​‘बागी2’साठी टायगर श्रॉफ करणार असे काही की, जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

​‘बागी2’साठी टायगर श्रॉफ करणार असे काही की, जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

googlenewsNext
यगर श्रॉफचे अलीकडे आलेले दोन्ही सिनेमे (द फ्लार्इंग जट्ट व मुन्ना मायकेल ) बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले. पण म्हणून निराश न होता टायगर आपल्या चाहत्यांसाठी नवा चित्रपट घेऊन येतो आहे. होय, ‘बागी2’ या चित्रपटात टायगर पुन्हा एकदा कमाल दाखवणार आहे. या चित्रपटासाठी टायगर एकीकडे जिममध्ये घाम गाळत असताना,दुसरीकडे एक अवाक करणारी बातमी आली आहे. होय, जी गोष्ट करताना बडे बडे स्टार कचरतात, ते काम टायगर ‘बागी2’मध्ये करणार आहे.टायगर असे काय करणार आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तर पुढे वाचा...

टायगर म्हणे, या चित्रपटासाठी मुंडन करणार आहे. धक्का बसला ना? पण हे खरे आहे. स्क्रिप्ट मागणी बघून टायगरने मुंडन करण्याची तयारी दाखवली आहे. होय, स्वत:ला भूमिकेत फिट बसवण्यासाठी टायगरने स्वत:च्या अतिप्रिय कुरळ्या केसांचे ‘बलिदान’ दिले आहे. त्यामुळेच काही दिवसांपासून टायगर डोक्यावर कॅप घालून हिंडतोय. काही दिवसांपूर्वी टायगर असाच कॅप घालून हिंडतांना दिसला होता. या वीकेंडला रेमो डिसूजाच्या ‘डान्स प्लस3’मध्येही तो कॅप घालूनच आला होता. पण त्यावेळी हे काय प्रकरण आहे, हे कुणालाच कळले नव्हते. पण आता मात्र सगळ्या गोष्टींवरून पडदा उठवलाय.

ALSO READ : बहीण कृष्णाला का चादरीत झाकून ठेवू इच्छितो टायगर श्रॉफ?

‘बागी2’ हा चित्रपट अहमद खान दिग्दर्शित करतोय. २००६ मध्ये आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे. ‘बागी’मध्येही टायगर हाच लीड रोलमध्ये होता. त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसली होती. पण ‘बागी2’मध्ये मात्र श्रद्धा ऐवजी टायगरची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हिची वर्णी लागली आहे. प्रतीक बब्बर हा सुद्धा या चित्रपटात एका निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे  प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी आतूर आहेत. दिशा व टायगरची रिअल लाईफ केमिस्ट्री शिवाय टायगरचे हे नवे लूक अशा दोन दोन इंटरेस्टिंग गोष्टी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
खरे तर टायगरच नाही तर ‘हैदर’साठी शाहिद कपूर, ‘सुल्तान’साठी सलमान खान आणि ‘बाजीराव मस्तानी’साठी रणवीर सिंह यांनीही मुंडण केले होते.

Web Title: Tiger Shroff for 'Baghi2' is something that, knowingly push you too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.