टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी निघाले लाँग ड्राइव्हला.. फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 17:48 IST2017-05-29T12:06:27+5:302017-05-29T17:48:43+5:30

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे आपल्या रिलेशनशीपला घेऊन नेहमीच चर्चेत असतात. अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि पार्ट्यांमध्ये त्यांना ...

Tiger Shrof and Direction Patani left for Long Drive .. Photo Viral on social media | टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी निघाले लाँग ड्राइव्हला.. फोटो सोशल मीडियावर व्हायरल

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी निघाले लाँग ड्राइव्हला.. फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे आपल्या रिलेशनशीपला घेऊन नेहमीच चर्चेत असतात. अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि पार्ट्यांमध्ये त्यांना एकमेकांबरोबर अनेक वेळा एकत्र पाहण्यात आले आहे. मात्र कधीही त्यांनी आपले नाते अधिकृतरित्या स्वीकारलेले नाही. नुकतेच त्यांचे लाँग ड्रायव्हवरचे फोटो व्हायलर झाले आहेत. या फोटोंमध्ये दिशा गाडी चालवताना दिसतेय तर टायगर श्रॉफ तिच्या बाजूच्या सीटवर बसलेला दिसतो आहे. 

दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच अॅटिव्ह असते. दिशा तिचे फोटो आणि डान्सचे व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा 'रोमियो अकबर वाल्टर'मध्ये झळकणार आहे. याचित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. एवढेच नाही तर दिशा करण जोहरच्या स्टूडेंट ऑफ द इअर 2 मध्ये सुद्धा दिसू शकते. 


नुकतीच दिशा कुंग फू योगा मध्ये दिसली होती. याचित्रपटात तिच्यासोबत हॉलिवूड सुपरस्टार जॅकी चैनपण होते. याचित्रपटाने भारतात जबरदस्त बिझनेस केला होता. यानंतर दिशाचा भाव इंडस्ट्रीत चांगलाच वाढला असल्याचे समजते आहे. दिशाने निर्मात्यांना रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ  यापैकी कोणी एक हिरो असेल तरच मी चित्रपटात काम करेन. अशी डिमांड हल्ली दिशा करत असल्याचे कळतेय.
तर दुसरीकडे टायगर श्रॉफ मुन्ना माइकलमध्ये दिसणार आहे. नुकतेच त्याचे रेम्बो चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.  याआधी ही अनेक वेळा टायगर आणि दिशाला लाँग ड्रायव्हर गेलेले असताना स्पॉट करण्यात आले होते. मात्र त्यावेळीसुद्धा त्यांनी ही गोष्ट स्वीकारली नव्हती.   

Web Title: Tiger Shrof and Direction Patani left for Long Drive .. Photo Viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.