​ येणार ‘टायगर जिंदा है’ सीक्वल! सलमान खानने सांगितले नाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 13:08 IST2018-06-10T07:38:05+5:302018-06-10T13:08:05+5:30

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटानंतर चाहत्यांना याच्या सीक्वलची आतुरतेने प्रतीक्षा आहे आणि ही प्रतीक्षा लवकरच ...

'Tiger is alive' sequel! Salman Khan said the name !! | ​ येणार ‘टायगर जिंदा है’ सीक्वल! सलमान खानने सांगितले नाव!!

​ येणार ‘टायगर जिंदा है’ सीक्वल! सलमान खानने सांगितले नाव!!

क था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटानंतर चाहत्यांना याच्या सीक्वलची आतुरतेने प्रतीक्षा आहे आणि ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. होय, सलमान खान व कॅटरिना कैफच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भाईजान सलमानने अप्रत्यक्षपणे याचे संकेत दिलेत. ‘रेस3’च्या प्रमोशनदरम्यान सलमान यावर बोलला. ‘टायगर जिंदा है’चा सीक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार का? असा प्रश्न सलमानला केला गेला. यावर होय, मी कथा ऐकली आहे, असे तो म्हणाला आणि नंतर या चित्रपटाचे नाव काय असणार हेही सांगितले. ‘टायगर जिंदा है’च्या सीक्वलचे नाव ‘जोया जिंदा है’ असेल, असे तो म्हणाला. अर्थातचं त्याच्या तोंडून हे ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. आता तुम्ही याला सलमानचा विनोद समजा वा त्याने दिलेले संकेत. प्रत्यक्षात ‘टायगर जिंदा है’चा सीक्वल बनण्याची शक्यता तुम्हीही नाकारू शकत नाही. ‘टायगर जिंदा है’चा क्लायमॅक्स बघता, याचा सीक्वल येणार हे कधीचेचं स्पष्ट झाले आहे. आता केवळ या सीक्वलच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

ALSO READ : रचला जात होता सलमान खानच्या हत्येचा कट! हरियाणा पोलिसांचा धक्कादायक खुलासा!!

‘टायगर जिंदा है’च्या जरबदस्त यशानंतर रेस-३’मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टार सलमानचा अ‍ॅक्शन अंदाज बघावयास मिळणार आहे.  ‘रेस’ फ्रेंचाइजीचा हा तिसरा चित्रपट असून, त्यामध्ये सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा धमाका बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब  सलीम यासारख्या भारदस्त कलाकारांचा समावेश आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाला टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनविण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले  आहे. 

Web Title: 'Tiger is alive' sequel! Salman Khan said the name !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.