टायगर जिंदा है या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई... आकडा वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:00 IST2017-12-23T11:30:05+5:302017-12-23T17:00:05+5:30
सलमान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ ...

टायगर जिंदा है या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई... आकडा वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
स मान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. एक था टायगर हा सलमान खान आणि कतरिनाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटातील अॅक्शन दृश्याची तर चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळेच एक था टायगर या चित्रपटाच्या यशानंतर टायगर जिंदा है हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी टायगरने ३३.७५ कोटी कमवले. या वर्षातील सगळ्यात जास्त ओपनिंग मिळालेला हा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी या वर्षात प्रदर्शित झालेल्या बाहुबली २ या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी ४१ कोटीचा गल्ला जमवला होता. चित्रपट ट्रेड अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी ट्वीट करून टायगर जिंदा है या चित्रपटाच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे.
टायगर जिंदा है या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटातील अनेक गाणी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हिट झाली होती. सलमानचा चित्रपट म्हटला की, त्याचे फॅन्स त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याचा ट्युबलाइट हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकेसे यश मिळवता आले नाही. सलमानने अनेक वर्षांनंतर फ्लॉप चित्रपट दिल्यामुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. त्यामुळे टायगर जिंदा है या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक होते. हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटासाठी अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग देखील केले आहे. या चित्रपटाचे अनेक शोज पहिल्याच दिवशी हाऊसफुल देखील झाले होते. आता हा चित्रपट पहिल्य आठवड्यात किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Also Read : इंटरनेटवर लिक झाला Tiger zinda hai movie...