तीन वर्षांपूर्वी प्रियांका चोप्राला करावा लागला ‘या’ प्रसंगाचा सामना, आता केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:14 IST2018-04-11T11:44:41+5:302018-04-11T17:14:58+5:30
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘क्वांटिको’ सीजन ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या ...

तीन वर्षांपूर्वी प्रियांका चोप्राला करावा लागला ‘या’ प्रसंगाचा सामना, आता केला खुलासा!
ब लिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘क्वांटिको’ सीजन ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या लोकप्रिय मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रियांका बंदूकीने निशाना साधताना दिसत होती. हॉलिवूडमध्ये प्रियांकाला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. यादरम्यान, प्रियांकाने आता एक असा खुलासा केला जे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. प्रियांकाने याबाबतचा खुलासा -- दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
या मुलाखतीदरम्यान, प्रियांकाने हॉलिवूडमधील त्या सत्याविषयी सांगितले, ज्याचा सामना एका रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही करावा लागला. प्रियांकासोबत ही घटना गेल्यावर्षी घडली होती. तिला केवळ वर्णभेदामुळे बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. प्रियांकाने सांगितले की, स्टुडिओमधून कोण्यातरी एका एजंटकडे फोन आला. फोनवर सांगण्यात आले की, ती शारीरिकदृष्ट्या ठीक नाही. मी एजंटला म्हटले, मला फिगरवर काम करावे लागेल की, अॅब्सवर? अखेर शारीरिकचा अर्थ काय? तेव्हा एजंटने सांगितले की, त्यांना अशी अभिनेत्री नको जिचा रंग सावळा आहे. प्रियांकासोबत घडलेला हा प्रसंग खरोखरच संतापजनक असून, असा सामना शिल्पा शेट्टीलाही ‘बिग ब्रदर’ या शोदरम्यान करावा लागला.
![]()
दरम्यान, प्रियांका बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जिने हॉलिवूडमध्ये काम करताना स्वत:ला सिद्ध केले. ‘क्वांटिको’च्या दोन्ही सीजनमध्ये प्रियांकाचा अभिनय दमदार राहिला. लवकरच तिचा तिसरा सीजन टेलिकास्ट होणार आहे. याव्यतिरिक्त प्रियांकाने ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे. वृत्तानुसार, प्रियांका लवकरच सलमान खानच्या ‘भारत’मध्ये बघावयास मिळणार आहे. प्रियांका गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. आता तिने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांकडे मोर्चा वळविला आहे.
प्रियांकाचा क्वांटिको सीजन-३ येत्या २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर अशाही बातम्या समोर येत आहेत की, प्रियांका क्वांटिकोच्या पुढच्या सीजनमध्ये बघावयास मिळणार नाही. असे म्हटले जात आहे की, प्रियांकाने हा निर्णय बॉलिवूडमुळे घेतला आहे.