​अनिल कपूरच्या बायोपिकमध्ये उलगडणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 11:30 IST2017-09-06T06:00:52+5:302017-09-06T11:30:52+5:30

आशा पारेख, ऋषी कपूर अशा दिग्गज कलाकारांच्या आयुष्यावरील पुस्तकं वाचकांना नुकतीच वाचायला मिळाली आहेत. आता बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याची ...

These things will be revealed in Anil Kapoor's biopic | ​अनिल कपूरच्या बायोपिकमध्ये उलगडणार या गोष्टी

​अनिल कपूरच्या बायोपिकमध्ये उलगडणार या गोष्टी

ा पारेख, ऋषी कपूर अशा दिग्गज कलाकारांच्या आयुष्यावरील पुस्तकं वाचकांना नुकतीच वाचायला मिळाली आहेत. आता बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याची बायोग्राफी लोकांना वाचायला मिळणार आहे. अभिनेता अनिल कपूरने वयाची साठी नुकतीच उलटली आहे. पण आजही तो तितकाच फिट आहे. त्याच्यापुढे आजचे तरुण हिरो देखील फिके पडतात. अनिल कपूर आता त्याचे आयुष्य लोकांसमोर उलगडणार आहे. तो त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहित असून ते लवकरच वाचकांच्या भेटीस येणार आहे. अनिल कपूरच्या आयुष्यावर पुस्तक येणार म्हणजे त्यात काय काय वाचायला मिळणार याची लोकांना उत्सुकता लागली आहे. अभिनेता म्हटले की त्याच्या आयुष्यात अफेअर, वादग्रस्त गोष्टी या असणार याची लोकांना चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे अनिल त्याच्या पुस्तकात त्याच्या अफेअरविषयी लिहिणार का तसेच आयुष्यातील काही वादग्रस्त गोष्टी मांडणार का याची उत्सुकला त्याच्या फॅन्सना लागली आहे. पण त्याच्या फॅन्सची निराशा होणार आहे. कारण त्याच्या पुस्तकात कोणताही मसाला नसणार असल्याचे त्यानेच स्वतः मीडियाशी बोलतना सांगितले आहे. अनिल त्याच्या बायोग्राफीविषयी सांगतो, मी माझ्या बायोग्राफीमध्ये कोणताही खुलासा करणार नाही. मी माझे सगळे आयुष्य अतिशय इमानदारीने लोकांसमोर मांडणार आहे. पण माझ्या पुस्तकामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची मी काळजी घेणार आहे. मी वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मी हमारे तुम्हारे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात मी एक छोटीशी भूमिका साकारली होती. आज मी ६१ वर्षांचा असलो तरी आजही या क्षेत्रात काम करत आहे. मी माझ्या मुलांसोबत देखील चित्रपटांमध्ये झळकत आहे. माझ्या प्रवासातून अनेकांना खूप काही शिकायला मिळणार आहे. मला माहीत आहे की, लोकांना माझ्या अफेअर्सविषयी जाणून घ्यायचे आहे. पण लोकांना माझ्या अफेअर्सविषयी का जाणून घ्यायचे आहे हेच मला कळत नाहीये. 
अनिलची बायोग्राफी प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक खालिद मोहोम्मद लिहिणार आहेत ते अनिलचे खूप जवळचे मित्र आहेत. याविषयी अनिल सांगतो, मी खालिद मोहोम्मदला अनेक वर्षं ओळखत असल्याने तोच माझी बायोग्राफी योग्यरितीने लिहू शकतो याची मला खात्री आहे. आमच्या दोघांचे करियर एकत्रच सुरू झाले आहे. खालिदशिवाय मला कोणीच चांगल्याप्रकारे ओळखू शकत नाही. 

Also Read : ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या फन्ने खानची शूटिंग सुरू

Web Title: These things will be revealed in Anil Kapoor's biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.