​...या पाच भारतीयांनी कोरले ‘आॅस्कर’वर नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 22:06 IST2016-12-16T22:06:52+5:302016-12-16T22:06:52+5:30

सतीश डोंगरे संगीतकार ए. आर. रहमान यांना पुन्हा एकदा आॅस्करसाठी नामांकन मिळाले अन् भारतभर आॅस्करविषयी चर्चा रंगू लागली. कारण ...

... These five Indians choreleaded 'Oscar' on the boat | ​...या पाच भारतीयांनी कोरले ‘आॅस्कर’वर नाव

​...या पाच भारतीयांनी कोरले ‘आॅस्कर’वर नाव

<
strong>सतीश डोंगरे


संगीतकार ए. आर. रहमान यांना पुन्हा एकदा आॅस्करसाठी नामांकन मिळाले अन् भारतभर आॅस्करविषयी चर्चा रंगू लागली. कारण आॅस्करविषयी केवळ इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या लोकांनाच उत्सुकता आहे असे नाही तर, सर्वसामान्य भारतीयदेखील या पुरस्काराची महती जाणून आहेत. त्यामुळे एखाद्या भारतीय चित्रपटाचे किंवा कलाकाराचे आॅस्करसाठी नाव जरी पुढे आले तरी, भारतीयांमध्ये उत्साह संचारतो. वास्तविक दरवर्षी आपल्याकडील आॅस्कर शर्यतीत एकतरी चित्रपट असतो. मात्र अखेरच्या क्षणी, पदरी निराशा पडते. त्यामुळेच आतापर्यंत या मानाच्या पुरस्कारावर केवळ पाचच भारतीयांना नाव कोरता आले. भारतीयांचा अभिमान वाढविणाºया या आॅस्कर विजेत्यांच्या आॅस्कर प्रवासाविषयीचा घेतलेला हा आढावा...

ए. आर. रहमान
‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी दोन आॅस्कर पटकाविणाºया संगीतकार ए. आर. रहमान पुन्हा एकदा आॅस्करच्या शर्यतीत आहेत. यावेळी ‘पेले : बर्थ आॅफ ए लीजेंड’ या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना नामांकन मिळाले आहे. बर्थ आॅफ ए लीजेंड हा चित्रपट महान फुटबॉलपटू पेले यांच्या जीवनावर आधारित आहे. पेले यांच्या फुटबॉल वारशाचा गौरव करण्यासाठी रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गिंगा’ या गाण्याला ‘ओरिजनल साँग’ आणि ‘ओरिजनल स्कोर’ या दोन श्रेणीत नामांकन मिळाले आहेत. ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी रहमान यांना ‘जय हो’ या गाण्यासाठी याच श्रेणींमध्ये दोन आॅस्कर पुरस्कार मिळाले आहेत. १९९५ मध्ये ‘रोजा’ या चित्रपटातून गीतकार गुलजार यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये कारकिर्द सुरू करणाºया रहमान यांनी आॅस्करमध्ये मिळवलेले यश भारतीयांचा गौरव वाढविणारे आहे. आता २६ फेब्रुवारी रोजी हॉलिवूडमधील ‘हॉलिवूड अ‍ॅँड हायलॅँड सेंटर’च्या डॉल्बी थिएटर सभागृहात पार पडणाºया ८९ एकादमी पुरस्कारात पुन्हा एकदा रहमान यांच्याकडून भारतीय तिरंगा फडकवला जावा हीच भारतीयांची अपेक्षा आहे.



देशाला पहिला आॅस्कर मिळवून देणारी महिला भानू अथैया

देशाला पहिला आॅस्कर मिळवून देणाºया भानू अथैया यांचा आॅस्कर प्रवास थक्क करणारा आहे. २८ एप्र्रिल १९२९ मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेल्या भानू अथैया यांचे पूर्ण नाव भानूमती अण्णासाहेब राजोपाध्येय असे आहे. लहानपणापासूनच गांधीजींपासून प्रेरित असलेल्या भानू यांना गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड एटनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या आंतरराष्टÑीय चित्रपटासाठी कॉस्ट्यूम डिझाइन करण्याची संधी मिळाली. भानू यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत, थेट आॅस्करच्या शर्यतीत स्थान मिळवले. त्यांना कॉस्ट्यूम श्रेणीत नामांकन मिळाले. १९८३ मध्ये पार पडलेल्या या आॅस्कर सोहळ्यात त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर भारताला पहिला आॅस्कर मिळाल्याचा मानही मिळाला. भानू या १९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिला कॉस्ट्यूम डिझाइन केला होता. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील झीनत अमान हिचाही कॉस्ट्यूम भानू यांनीच डिझाइन केला होता. 



सत्यजित रे

जगातील पहिल्या दहा चित्रपट निर्मात्यांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणाारे निर्माते सत्यजित रे यांची आॅस्करवारी प्रेरणादायी आहे. त्यांनी कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती करून आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली. मात्र त्यांनी कधीही त्यांचा चित्रपट आॅस्करच्या रेसमध्ये पाठविला नव्हता. खरं तर प्रत्येक चित्रपट निर्मात्यांचा आॅस्कर पुरस्कार मिळवणे हे स्वप्न असते, परंतु सत्यजित रे हे कधीच आॅस्करच्या मागे लागले नाहीत तर आॅस्करच त्यांच्याकडे चालून आला. त्यावेळी त्यांच्या ‘पाथेर पांचाली’ आणि ‘अपू त्रयी’ या दोन चित्रपटांनी जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये शेकडो पुरस्कारांची लयलूट केली होती. अशातही त्यांनी हे चित्रपट आॅस्करसाठी पाठविले नव्हते. जाणकारांच्या मते, या चित्रपटांनी अनेक श्रेणींमध्ये आॅस्कर पुरस्कार पटकावले असते, त्यामुळे सत्यजित रे यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक होता. मात्र म्हणतात ना ‘प्रतिभा ही कधीच लपून ठेवली जात नाही’ हे वाक्य सत्यजित रे यांच्याबाबतीत तंतोतंत खरे ठरले. १९९२ मध्ये लाइफटाइम अचिव्हमेंट या श्रेणीत विश्वातील सिनेमा जगतात अभुतपूर्व योगदान दिल्याच्या पार्श्वभूमीवर स्वत: कोलकाता येथे त्यांना आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्यजित रे यांची प्रकृती गंभीर होते. कोलकात्यात पार पडलेल्या या सोहळ्याची एक फिल्म बनवून ती मुख्य आॅस्कर सेरेमनीमध्ये दाखविण्यात आली. त्यावेळी जगभरातील चित्रपट निर्मिती क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी सत्यजित रे यांना उभे राहून त्यांच्या कार्याला दाद दिली. सत्यजित रे यांनी २९ चित्रपट आणि दहा डॉक्यूमेट्रींची निर्मिती केली. आजही त्यांचा हा यशस्वी प्रवास विद्यार्थ्यांना शिकवला जातो. 



रेसूल पूकुट्टी
‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील साउंड मिक्सिंगसाठी रेसूल पूकुट्टी यांना आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बेस्ट साउंड या श्रेणीत त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. यावेळी ए. आर. रहमान यांनाही याच चित्रपटासाठी दोन आॅस्कर मिळाले होते. आॅस्करबरोबरच रेसूल यांनी प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गोल्डन रील’ या अवॉर्डवरही नाव कोरले आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते आशियामधील पहिली व्यक्ती ठरले आहेत. दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणावर त्यांनी ‘इंडियाज डॉटर’ या डॉक्यूमेंट्रीत साउंड एडिटर्स म्हणून काम केले होते. त्यासाठीच त्यांना ६३व्या ‘गोल्डन रील’ अवॉर्डमध्ये बेस्ट मोशन पिक्चर साउंड एडिटर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 



गुलजार साहब 
आपल्या शब्दांनी चित्रपटाला एक नवे वळण देणारा किमयागार गुलजार साहब यांचा आॅस्कर प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी असा आहे. रूमानी आवाजाचा शहेनशहा अशी ओळख असलेल्या गुलजार यांचा जन्म पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यात १८ आॅगस्ट १९३४ साली झाला. त्यांचे लहानपणीचे नाव संपूरण सिंह कालरा असे होते. उर्दूवर जबरदस्त पकड असलेल्या गुलजार साहब यांनी आपल्या शब्दांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे अशा गीतकाराला आॅस्करने सन्मानित करणे भाग्यच होते. पाच नॅशनल आणि २० फिल्मफेयर अवॉर्ड पटकाविणाºया गुलजार साहब यांना २००८ मध्ये आॅस्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याला शब्दबद्ध करण्यासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ गीत या श्रेणीत आॅस्करने सन्मानित करण्यात आले होते. 

Web Title: ... These five Indians choreleaded 'Oscar' on the boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.