​‘या’ चित्रपटांनी केली विकेंडला छप्पर फाड कमाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 12:21 IST2018-05-17T06:49:26+5:302018-05-17T12:21:51+5:30

-रवींद्र मोरे  यावर्षी सुरुवातीपासूनच बरेच मोठ्या बॅनरचे चित्रपट रिलीज झाले. काही सुपरहिट ठरले तर काहींनी दर्शकांना खूपच निराश केले. ...

'These' films have earned a sixth of the wax! | ​‘या’ चित्रपटांनी केली विकेंडला छप्पर फाड कमाई !

​‘या’ चित्रपटांनी केली विकेंडला छप्पर फाड कमाई !

ong>-रवींद्र मोरे 
यावर्षी सुरुवातीपासूनच बरेच मोठ्या बॅनरचे चित्रपट रिलीज झाले. काही सुपरहिट ठरले तर काहींनी दर्शकांना खूपच निराश केले. कमाईच्या बाबतीत विचार केला तर असे काही चित्रपट आहेत ज्यांनी विकेंडला छप्परफाड कमाई करत दर्शकांचे चांगलेच मनोरंजन केले. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबाबत...
 
* पद्मावत
Related image
आतापर्यंतचा सर्वात विवादित चित्रपट ‘पद्मावत’ २०१७ मध्ये रिलीज होणार होता, मात्र वादविवादानंतर रिलीज डेट बदलण्यात आली. २५ जानेवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला सुमारे ११४ कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या विकेंडला सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दीपिका पादुकोण स्टारर या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केली होती. हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिल भाषांमध्ये रिलीज झाला होता.  

* बागी 2
Image result for baaghi 2
३० मार्च रोजी रिलीज झालेला अहमद खान दिग्दर्शित ‘बागी 2’ कमाईच्या बाबतीत टायगर श्रॉफच्या करिअरसाठी सर्वात मोठा चित्रपट ठरला. या चित्रपटाचे बॉक्स आॅफिसचे कलेक्शन सुमारे १६५ कोटीपेक्षा जास्त होते. आतापर्यंतचा हा दुसरा चित्रपट आहे ज्याने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात ७३.१० कोटीची कमाई केली होती.  

* रेड
Related image
सत्य घटनेवर आधारित अजय देवगन स्टारर ‘रेड’ चित्रपटानेही कमाईच्या बाबतीत सर्वांना चकित केले होते. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर १४२ कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. विशेष म्हणजे पहिल्याच आठवड्यात सुमारे ४१.१० कोटीची कमाई करत वर्षातला तिसरा मोठा चित्रपट ठरला.  

* पॅडमॅन 
Image result for padman
‘पॅडमॅन’ देखील सत्य कथेवर आधारित होता. ज्यात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. महिलांच्या मासिक पाळीतील समस्यांवर आधारित अक्षयच्या या चित्रपटालाही दर्शकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने पहिल्या विकेंडला ४०.०५ कोटीपेक्षा जास्त कमाई करत बॉक्स आॅफिस दणाणून सोेडले होते.   

* राजी
Related image
नुकताच मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. सहमत खानच्या भूमिकेतील आलिया भट्टचा अभिनय पाहून दर्शकांनी तिला डोक्यावरच घेतले आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत पुढेच जात आहे. पहिल्या आठवड्याच्या कमाईचा विचार केला तर या चित्रपटाने सुमारे ५० कोटीची कमाई केली आहे.   
  

Web Title: 'These' films have earned a sixth of the wax!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.