'या' बॉलिवूड चित्रपटांचा ऐनवेळी बदलला Climax !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 17:57 IST2017-11-25T12:27:48+5:302017-11-25T17:57:48+5:30
-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत ज्यांचा शेवट आपणास आवडत नाही किंवा असे वाटते की, याचा शेवट अजून ...

'या' बॉलिवूड चित्रपटांचा ऐनवेळी बदलला Climax !
बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत ज्यांचा शेवट आपणास आवडत नाही किंवा असे वाटते की, याचा शेवट अजून चांगला असू शकला असता. मात्र कदाचित आपणास माहित नसेल की, असे काही चित्रपट आहेत ज्यांचा जो शेवट लोकांनी पाहिला तो नंतर बदलण्यात आला होता, म्हणजेच ऐनवेळी क्लायमेक्स बदलण्यात आला होता. अशाच काही चित्रपटांबाबत आज आपण जाणून घेऊया..!
* शोले
१९७५ मध्ये रमेश सिप्पी निर्देशित ‘शोले’ रिलीज झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन आणि संजिव कुमार लीड रोलमध्ये होते. या चित्रपटाचा शेवट रिलीज होताना वेगळा होता आणि नंतर बदलण्यात आला होता. चित्रपटाच्या शेवटी गब्बर हार मानतो आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाते, असे दाखविण्यात आले आहे. मात्र रमेश सिप्पीने जो शेवट लिहिला होता त्यात ठाकुर गब्बरला खूपच निर्दयीपणे ठार करतो, असे होते. मात्र सेंसॉर बोर्डाच्या सांगण्यावरु न सिप्पीला चित्रपटाचा शेवट बदलावा लागला.

* आँखे
२००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘आँखे’ चित्रपटात अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुष्मिता सेन लीड रोलमध्ये होते. चित्रपटाच्या शेवटी अमिताभ बच्चन गुन्हा कबुल करुन जेलमध्ये जातो आणि अक्षय- अर्जुन दोघेही राहुलचा म्हणजे सुष्मिता सेनचा लहान भावाचा सांभाळ करतात. मात्र या चित्रपटाचा शेवट वेगळाच लिहिण्यात आला होता, ज्यात अमिताभ पोलिसांना लाच देऊन पसार होतो आणि रेल्वे स्थानकावर पोेहचतो. त्याठिकाणी अक्षय-अर्जूनदेखील ट्रेनची वाट पाहत असतात. दोघांना पाहून अमिताभ म्हणतो की, ‘आता खरा खेळ सुुरु होईल...’ त्यानंतर अक्षय-अर्जुन आपली बंदूक बाहेर काढून अमिताभच्या दिशेने ओढतात. मात्र या चित्रपटाचा हा शेवटदेखील भारतीय प्रेक्षकांनुसार बदलण्यात आला होता.

* पीके
आमिर खान आणि अनुष्का शर्माचा ‘पीके’ चित्रपटाचा शेवटदेखील बदलण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी असे दाखविण्यात आले होते की, आमिर खान पृथ्वी सोडून गेल्यानंतर पुन्हा रणबीरसोबत परत येतो. हा बदल फक्त पे्रक्षकांच्या आनंदासाठी बदलण्यात आला होता. मात्र पहिल्या स्क्रिप्टमध्ये अनुष्का- सुशांतचा बॅटरी चार्ज डांससोबतच चित्रपट संपविण्यात आला होता. विशेष म्हणजे हा निर्णय टेस्ट स्क्रीनिंगनंतर घेण्यात आला होता.

* दिल्ली ६
अभिषेक बच्चन आणि सोनम कपूरच्या लिड रोल असलेला दिल्ली ६ या चित्रपटाचाही शेवट प्रेक्षकांनुसार बदलण्यात आला होता. चित्रपटात सर्वांनी पाहिले की, शेवटी अभिषेक बच्चनचा जीव वाचतो, मात्र राकेश ओमप्रकाश मेहराच्या अगोदरच्या स्क्रिप्टमध्ये अभिषेकच्या मृत्युने चित्रपट संपतो असे होते. मात्र तो शेवट बदलण्यात आला होता.

* पिंक
२०१६ मध्ये रिलीज झालेला कोर्ट रुम ड्रामा ‘पिंक’ या चित्रपटाचा शेवटदेखील वेगळाच होता. यात शेवटी मुलींना न्याय मिळून आरोपींना शिक्षा मिळते असे दाखविण्यात आले होते. मात्र अगोदरच्या स्क्रिप्टमध्ये मुलींना न्याय मिळतच नाही, असे होते. मात्र चित्रपटाला व्हॅल्यूएबल बनविण्यासाठी शेवट बदलण्यात आला होता.