‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींची कमाई हॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही जास्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 18:29 IST2017-05-03T12:59:20+5:302017-05-03T18:29:20+5:30

अबोली कुलकर्णी  फिल्मस्टार्स हे केवळ कलाकार नव्हे तर ते सर्वसामान्यांचे ‘आयडॉल’ असतात. त्यांचे राहणीमान, वेशभूषा, विचारप्रणाली, आवडीनिवडी हे सर्वच ...

'These' Bollywood celebrities earn more than Hollywood celebrity! | ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींची कमाई हॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही जास्त!

‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींची कमाई हॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही जास्त!

ong>अबोली कुलकर्णी 

फिल्मस्टार्स हे केवळ कलाकार नव्हे तर ते सर्वसामान्यांचे ‘आयडॉल’ असतात. त्यांचे राहणीमान, वेशभूषा, विचारप्रणाली, आवडीनिवडी हे सर्वच आपल्यासाठी एक आकर्षण असते. नावलौकिक, संपत्ती, झगमगाट यासर्वांसाठी हे सेलिब्रिटी अक्षरश: रात्रंदिवस झटत असतात. साहजिकच त्यांनी हे ब्रँडेड जग त्यांच्या कष्टाने कमावलेले असते. मात्र, तरीही बॉलिवूड स्टार्सची सतत हॉलिवूड स्टार्ससोबत तुलना सुरू असते. आता हेच पाहा ना, बॉलिवूडमधील असे काही सेलिब्रिटी आहेत जे हॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही जास्त कमाई करतात. कोण आहेत हे बॉलिवूड-हॉलिवूड स्टार्स पाहूयात...

टॉम क्रुझ-शाहरूख खान
टॉम क्रुझ याला ‘मोस्ट रोमँटिक’ हॉलिवूड अभिनेता म्हणून ओळखले जाते. अनेक हॉलिवूड अभिनेत्री त्याच्यासोबत चित्रपट मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात. बॉलिवूडमध्येही शाहरूख खानसोबत काम करायला कोणत्या अभिनेत्रीला आवडणार नाही? मात्र, हॉलिवूडमध्ये टॉम क्रुझचे नाव असले तरीही शाहरूख खानची कमाई टॉमपेक्षा जास्त होते. विश्वास बसत नाही ना? मग पाहा, टॉमची कमाई चित्रपट, जाहिराती हे सर्व मिळून ४८४.६ मिलीयन डॉलर एवढी आहे तर शाहरूख खान ६०० मिलियन डॉलर एवढी कमाई करतो. आहे की नाही, टॉमपेक्षा शाहरूखची कमाई जास्त! 



ब्रॅड पिट-हृतिक रोशन 
रोमँटिक अभिनेत्यांचा विषय निघाला की, ब्रॅड पिटचे नाव अग्रेसर असते. त्याचसोबत हृतिक रोशनचेही नाव अनेकदा घेतले जाते. जाहिराती, चित्रपट, इतर कार्यक्रम या सर्वांची मिळून ब्रॅड पिटची कमाई २४९ मिलीयन डॉलर एवढी आहे तर हृतिक रोशनची ३४० मिलीयन डॉलर एवढी कमाई आहे. हृतिक रोशनला ‘रोशन’ या नावामुळेच अनेक प्रोजेक्टस आणि जाहिराती मिळतात. या दोघांच्याही कमाईचे आकडे हे विश्वास न बसण्यासारखेच आहेत. नाही का? 



ह्यूग जॅकमॅन-सलमान खान

ह्यूग जॅकमॅन हा हॉलिवूडचा खुप मोठा कलाकार. याची कमाई ही १२३ मिलियन डॉलर एवढी असून ‘दबंग स्टार’ सलमान खानच्या कमाईचा आकडा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे २०० मिलीयन डॉलर एवढा आहे. त्याच्या कमाईतील काही रक्कम तो काही चॅरिटी संस्थांना देत असतो. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नाव प्रत्येक चाहत्याच्या हृदयात कोरलेले आहे. 



चार्ली शीन-आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करतो. त्याची कमाई २०५ मिलीयन डॉलर्स एवढी असून चार्ली शीनची केवळ १२५ मिलियन एवढीच कमाई असल्याचे आढळून आले आहे. 



टॉम हँक्स-अमिताभ बच्चन
शहेनशाह अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमध्येही सर्वांचे ‘बाप’ (अभिनयाच्या बाबतीत) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अभिनयावर कुणीही शंका घेऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे टॉम हंक्स याचेही हॉलिवूडमध्ये खुप चाहतावर्ग आहे. मात्र, तरीही तो बिग बींपेक्षा कमाईच्या बाबतीत मागे आहे. सीनिअर बच्चन हे ४३४.८ मिलीयन डॉलर्स एवढी कमाई करतात तर टॉम हंक्स ३५० मिलीयन डॉलर एवढी कमाई करतो. 



अल पसिनो-अक्षय कुमार

 अमेरिकन अभिनेता, दिग्दर्शक, स्क्रिप्टरायटर, निर्माता अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये लीलया फिरणारा अल पसिनो हा १४५ मिलीयन डॉलर एवढी कमाई करतो. बॉलिवूडचा छूपा ‘रूस्तुम’ अक्षय कुमार हा १५० मिलियन डॉलर एवढी कमाई करून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतो.  


Web Title: 'These' Bollywood celebrities earn more than Hollywood celebrity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.