या बॉलीवूड अभिनेत्रींनी तोडल्या सभ्येतेच्या सर्व मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:09 IST2017-01-12T18:09:21+5:302017-01-12T18:09:21+5:30

आज बॉलीवूडमध्ये किंवा मनोरंजन विश्वात मोठे नाव कमावलेल्या कलाकारांच्या भूतकाळात डोकावून पाहिल्यावर कळते की, इंडस्ट्रीमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ...

These Bollywood actresses have all the limitations of breaking up | या बॉलीवूड अभिनेत्रींनी तोडल्या सभ्येतेच्या सर्व मर्यादा

या बॉलीवूड अभिनेत्रींनी तोडल्या सभ्येतेच्या सर्व मर्यादा

बॉलीवूडमध्ये किंवा मनोरंजन विश्वात मोठे नाव कमावलेल्या कलाकारांच्या भूतकाळात डोकावून पाहिल्यावर कळते की, इंडस्ट्रीमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा प्रकाश झोतात येण्यासाठी त्यांनी अनेकदा सभ्येतेच्या सर्व मर्यादा सोडलेल्या आहेत. काही बॉलीवूड तारकांनी अशा जाहिरातींमध्ये काम केले आहे की त्यातील बीभत्सपणामुळे त्यांच्यावर बंदी घातली गेली. पाच तारकांच्या अशाच काही ‘अतिरंजित’ व वादग्रस्त जाहिरातीचा येथे मागोवा घेण्यात आला आहे ज्यांच्यावर बॅन लागली.

१. बिपाशा बसू

Bipasha


‘बंगाली ब्लॅक ब्युटी’ बिपाशाने मोठ्या पडद्यावर नेहमीच बोल्ड आणि सेक्सी भूमिका करणे पसंत केले आहे. सेन्शुअस आणि तोडके कपडे घालून सीन्स करण्याला तिने कधीच मनाई केली नाही. बरं हे केवळ चित्रपटांपुरतेच मर्यादित आहे असे नाही. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिने ‘न्यू यॉर्क लोटो’च्या जाहिरातीमध्ये अंशत: नग्न काम केले होते. यामध्ये तिच्यासोबत विवेक ओबेरॉय देखील होता. जाहिरात एवढी बोल्ड आणि सेक्सी होती की, भारतात तिच्यावर बंदी घातली गेली.
२. मधू सप्रे

MAdhu Spare Milind


नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेल्या एका शुजच्या जाहिरातीसाठी मधू सप्रे आणि मिलिंद सोनम पूर्णत: नग्न झाले होते. त्यांच्या अशा बोल्ड आणि कशाचीही तमा न बाळगता केलेल्या जाहिरातीमुळे मधू सप्रे रातोरात ‘टॉक आॅफ द टाऊन’ बनली. आजही या जाहिरातीची लोकप्रियता कमी झालेली नाही. न्यूड पोजमध्ये पायात केवळ शूज घातलेल्या मिलिंद-मधूच्या अंगाभोवती अजगराने विळखा घातलेला फोटो आयकॉनिक मानला जातो. अ‍ॅड बॅन झाली होती हे काही वेगळे सांगायला नको.
३. सना खान

Sana Khan


‘टॉर्इंग गर्ल’ म्हणून सना खान एका अंडरवियरच्या जाहिरातीमुळे प्रकाशझोतात आली होती. या जाहिरातीमध्ये सना एक गृहिणी दाखवली असून ती पतीची अंडरवियर धुत असताना तिच्या कामुक भावना जाग्या होतात असे दाखवले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय टेलिव्हजनवर ही जाहिरात दाखवण्यात येत असे. परंतु अनेक तक्रारींनंतर तिच्या बंदी घालण्यात आली.
४. मलायका अरोरा खान

Maliaka


मलायका अरोरा नेहमीच बोल्ड सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध राहिलेली आहे. कॉफीच्या एका ब्रँडसाठी केलेल्या जाहिरातीमध्ये पती अरबाज खानसोबत तिने फारच मादक काम केले होते. ‘परमानंद हा काही एका क्षणात येत नसतो’ अशी कामुकतेकडे झुकणाऱ्या टॅगलाईन वरूनच जाहिरातीचा ‘खरा’ उद्देश कळतो. अ‍ॅडमध्ये कॉफी राहते एकीकडे आणि मलायका-अरबाजी ‘सेन्शुअ‍ॅलिटी’ जास्त दिसते. अखेर भारतीय प्रेक्षकांना अशी ‘कॉफी’ काही गोड लागणार नव्हती. म्हणून तिच्यावर बंदी आणली.
५. पूजा बेदी

Pooja Bedi


कॉन्डोमची जाहितरात भारतामध्ये नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहेत. पूजा बेदीला याचा चांगलाच अनुभव आहे. कॉन्डोमच्या एका जाहिरातीमध्ये तिला सुमारे मिनिटभर आंघोळ करताना दाखवण्यात आले होते. घरी कुटुंबासोबत टीव्ही पाहणाऱ्या आपल्या देशातील समाजाला हे काही फारसे रुचणारे नसल्यामुळे तिला बॅन करण्यात आले. मात्र यामुळे पूजाला चांगलीच पब्लिसिटी मिळाली.

Web Title: These Bollywood actresses have all the limitations of breaking up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.