या कलाकारांनी तिहेरी तलाक नव्हे तर न्यायालयीन घटस्फोटावर ठेवला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:52 IST2017-09-11T07:22:51+5:302017-09-11T12:52:51+5:30
तिहेरी तलाकची मान्यता सुप्रीम कोर्टाने नुकतीच रद्द केली आहे. त्यामुळे अनेक मुस्लिम स्त्रियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तुम्हाला माहीत ...

या कलाकारांनी तिहेरी तलाक नव्हे तर न्यायालयीन घटस्फोटावर ठेवला विश्वास
त हेरी तलाकची मान्यता सुप्रीम कोर्टाने नुकतीच रद्द केली आहे. त्यामुळे अनेक मुस्लिम स्त्रियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी आपल्या पत्नीला तिहेरी तलाक न देता कायदेशीर तलाक दिला आहे. त्यांनी न्यायालीन घटस्फोटावर अधिक विश्वास ठेवला. जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...
आमिर खान आणि रिना दत्ता
आमिर खानच्या कयामत से कयामत तक या चित्रपटातील पापा कहते है या गाण्यात आपल्याला रिना दत्ताची एक झलक पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधीच आमिर आणि रियाचे १९८६ मध्ये लग्न झाले होते. पण लग्नाच्या १५ वर्षांनंतर किरण राव आमिरच्या आय़ुष्यात आली आणि आमिर आणि रिनाने वेगळे व्हायचे ठरवले. २००२ मध्ये त्यांनी न्यायालयात जाऊन घटस्फोट घेतला. त्यांना इरा आणि जुनैद अशी दोन मुलेदेखील आहेत.
![aamir khan reena dutta]()
अरबाज खान आणि मलाइका अरोरा
अरबाज आणि मलाइका हे बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या जोडप्यांपैकी एक मानले जात होते. त्यामुळे ते कधी घटस्फोट घेतील असे कोणाला वाटले देखील नव्हते. पण १८ वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्यांनी नुकताच घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या दोघांना अरहान हा एक मुलगा देखील आहे.
![arbaaz khan malaika arora]()
अमृता सिंह आणि सैफ अली खान
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यात वयाचे अंतर असल्याने सैफ अली खानच्या घरातील अनेकजण या दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते. सैफने त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमृतासोबत लग्न करणे त्यांना रुचले नव्हते. पण घरातल्यांच्या विरोधात जाऊन सैफने १९९१ मध्ये अमृतासोबत लग्न केले. २००४ मध्ये रोझी ही इटलीमधील मॉडेल सैफच्या आयुष्यात आली आणि सैफ-अमृताने वेगळे व्हायचे ठरवले. त्यांनी कोर्टात जाऊन घटस्फोट घेतला. सैफने त्यानंतर २०१२मध्ये करिना कपूरसोबत लग्न केले.
![saif ali khan amruta singh]()
फरहान अख्तर आणि अधुना
अधुना फरहान अख्तरच्या प्रत्येक प्रोजक्टमध्ये त्याच्यासोबत असायची. दिल चाहता है या चित्रपटातील आमिर खान, सैफ अली खान यांच्या हेअर स्टाइलची चांगलीच चर्चा झाली होती. ही हेअरस्टाइल अधुनानेच केली होती. फरहान आणि अधुनाचे लग्न २००० मध्ये झाले होते तर २०१७ मध्ये त्यांनी कोर्टात सहमतीने घटस्फोट घेतला.
![farhan akhtar adhuna]()
जावेद अख्तर आणि हनी इराणी
जावेद अख्तर आणि हनी इराणी यांनी देखील न्यायालयात जाऊन सहमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमीसोबत लग्न केले. फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही त्यांचीच मुले असून आज बॉलिवूडमध्ये त्यांनी चांगलेच यश मिळवले आहे.
![javed akhtar honey irani]()
Also Read : ‘ट्रिपल तलाक’मुळे मोडला होता मीनाकुमारीचा संसार; तिची कथा वाचून तुम्हालाही रडू कोसळेल!