हे आहेत सलमान खान,रणबीर कपूर,टायगर श्रॉफ यांच्या फिटनेसवर मेहनत घेणारे चेहरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:52 IST2017-02-23T11:22:45+5:302017-02-23T16:52:45+5:30
बॉलिवूडचे हे अभिनेते जीममध्ये तासनतास वर्कआऊट करत आपली बॉडी मेंटेन करत असतात. मात्र ते किती मेहनत घेतात याचविषयी माहिती ...

हे आहेत सलमान खान,रणबीर कपूर,टायगर श्रॉफ यांच्या फिटनेसवर मेहनत घेणारे चेहरे
ब लिवूडचे हे अभिनेते जीममध्ये तासनतास वर्कआऊट करत आपली बॉडी मेंटेन करत असतात. मात्र ते किती मेहनत घेतात याचविषयी माहिती समोर येत असते. मात्र य सेलिब्रेटींच्या मागे असतो एक चेहरा तो यांच्यावर खूप मेहनत घेत असतो तो म्हणजे फिटनेस ट्रेनर.बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटी रूपेरी पडद्यावर सिनेमाच्या माध्यमातून रसिकांना नाचवत असले तरी हे सेलिब्रेटींनाही फिटनेस ट्रेनरनुसार वागावे लागते.या सेलिब्रेटींसाठी हे फिटनेस ट्रेनर त्यांच्यावर तासन तास मेहनत घेताना दिसतात.जाणून घेवूयात कोण आहे या सेलिब्रेटींच्या पाठीमागे परफेक्ट बॉडी मिळवून देणारे चेहरे.
![]()
टायगरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर फिरवली की लक्षात येईल तो आपल्या बॉडीवर किती मेहनत घेतो. त्यासाठी त्याला आठ जणांची टीम मदत करते. हे आठ लोक टायगरच्या व्यायामाचे वेळापत्रक, डाएट प्लॅन बनवून त्याचे तंतोतंत पालन करवून घेण्याचे काम करतात. त्यामध्ये मग कोणी जिम्नॅस्टिक प्रशिक्षक आहे तर कोणी डाएट एक्सपर्ट आहे.नुकतेच टायगरने या टीमसोबत एक फोटो शेअर केला. त्याचा फिटनेस ट्रेनर आणि न्युट्रिशनिस्ट नितेश शर्मा ने सांगितले की, टागयर व्यायामाच्या बाबतीत फार शिस्तबद्ध आहे. तो कधीच व्यायाम चुकवत नाही. आपण काय खातो याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे मी आहाराच्याबाबतीत फार अलर्ट राहतो. त्यासाठी माझा योग्य डाएट मी आखला असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच दिवसातून किमान दोन तास तरी मी डान्स करतो.
![]()
सत्यजित चौधरी हा फिटनेस ट्रेनर सैफवर बॉडी बिल्डींगसाठी खूप मेहनत घेत असतो. सैफच्या मते एक्ससाईज करणे हे प्रत्येक व्यक्तिने आपल्या दैनदिन जीवनाचा हिस्सा बनवणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वॉक घेण्या इतकी एक्ससाइज दुसरी कोणतीच नसल्याचे ही सैफने सांगितले. चालणे हे फक्त तुम्हाला फिजिक्ली नाही तर मेंटली ही फिट ठेवते.
![]()
वरुण कितीही पार्टी-फन लव्हिंग असला तरी रोजच्या रोज जिममध्ये व्यायाम केल्याशिवाय राहत नाही. ‘फिटनेस फ्रीक’ वरुणच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गेले असता तुम्हाला त्याचे अनेक ‘जिम पिक्स’ पाहायला मिळतील. तो अधुनमधून त्याच्या जिम सेशनचे फोटो चाहत्यांशी शेअर करीत असतो. पीळदार शरीर कमावलेला वरुण या फोटोंमध्ये किती हॉट दिसत असेल हे काही वेगळे सांगायला नको.प्रशांत सावंत हा ट्रेनर वरूनला त्याच्या खास टीप्सने फिट ठेवतो.
![]()
बॉलिवूडमध्ये मैचोमॅन म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहम त्याच्या फिटनसेला घेवून खूप पब्लिसिटी मिळवत असतो.जिममध्ये वर्कआऊटच करत नाही तर योगा करण्यातही विशेष भर देत असतो.विनोद छन्ना फिटनेस ट्रेनर जॉन अब्राहमला फिट ठेवण्यासाठी मदत करतो.
![]()
तर सलमान खानवरही त्याच्या परफेक्ट लुक बॉडीमुळे तरूणी घायाळ होत असतात.गेल्या कित्येकवर्षापासून सलमानचा मनीष अव्दैलकर ट्रेन करतो. जिमव्यतिरिक्त सलमान सायकलिंग करणे, वॉक करणे या गोष्टींवरही जास्त भर देतो.
![]()
सोनु सूद गेल्या वर्षापासून त्याचे सिक्स पॅक अबवर विशेष मेहनत घेतो.दिवसाला 3 तास तो जिमट्रेनर योगेश भतेजाच्या मदतीने वर्कआऊट करतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळतो. योग्य तो डाएट फॉलो करण्यात त्याचा कल असतो.
![]()
कुणाल गिरच्या मदतीने रणबीर कपूर त्याचे बॉडी मेंटेम करत असतो. नुकताच संजय दत्त बयोपिकसाठी 13 किलो वजन वाढत रणबीरने संजय दत्तच्या बॉडीप्रमाणे बॉडी बनवल्याचे पाहायला मिळाले. सुदृढ बॉडी कमावण्यात हा केवळ सेलिब्रेटींचा वाटा नसून या फिटनेस ट्रेनरचाही मोलाचा वाटा असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.