...या अभिनेत्रींनी लावला ‘किस’चा तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 19:27 IST2017-01-03T18:20:56+5:302017-01-03T19:27:12+5:30

पूर्वी बॉलिवूडपटांमध्ये ‘किस सीन’ देणे फारच जोखमीचे समजले जात होते. स्क्रीप्टची फारच डिमांड असल्यास खास टेक्निकचा वापर करून किस ...

... These actresses hit the 'Kiss' tadka | ...या अभिनेत्रींनी लावला ‘किस’चा तडका

...या अभिनेत्रींनी लावला ‘किस’चा तडका

र्वी बॉलिवूडपटांमध्ये ‘किस सीन’ देणे फारच जोखमीचे समजले जात होते. स्क्रीप्टची फारच डिमांड असल्यास खास टेक्निकचा वापर करून किस सीन दाखविला जात असे. मात्र, सध्या चित्रपटात किस सीन देणे सामान्य बाब झाली आहे. २०१६ मध्ये आलेल्या सिनेमांमध्ये किसचा अक्षरश: भडिमार केला गेला. ज्या अभिनेत्रींकडून अशा सीन्सची अपेक्षा नव्हती त्यांनीही किस सीन्स देत हॉटनेसचा तडका लावला. यातील काही सीन्समुळे कॉन्ट्रोर्व्हसीही निर्माण झाली होती. 



करिना कपूर-अर्जुन कपूर
करिना आणि अर्जुन कपूर यांचा ‘कि अ‍ॅण्ड का’ हा चित्रपट दोघांमधील किस सीन्समुळे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसी कमाल दाखवू शकला नसला तरी, दोघांमधील हॉट केमिस्ट्री हिट ठरली. आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत करिनाने जबरदस्त हॉट किस सीन्स दिले. 



कॅटरिना कैफ - आदित्य रॉय कपूर
वर्षाच्या सुरुवातीला रिलिज झालेल्या ‘फितूर’ या चित्रपटातील कॅटरिना आणि आदित्य रॉय कपूर यांचा लिप लॉक सीन्स चर्चेत राहिला. कॅटरिनाचे रणबीर कपूरबरोबरच्या संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याने कॅटरिनाचा लिप लॉक सीन्स वेगवेगळ्या अर्थाने बघितले गेले. पण काहीही असो, दोघांमधील हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली नसेल तरच नवल. 



यामी गौतम - पुलकित सम्राट
‘सनम रे’ या चित्रपटातील यामी गौतम आणि पुलकित सम्राट यांच्यातील किसिंग सीन्स खूपच कॉन्ट्रोर्व्हशल ठरला. कारण पुलकित यांची पत्नी श्वेता हिला दोघांचा किसिंग सीन्स अजिबात भावला नव्हता. यामुळे दोघांमध्ये मतभेदही झाल्याचे समोर आले होते. मात्र या सीनमुळे चित्रपटाला हॉटनेसचा चांगलाच तडका लावला गेला. 



श्रद्धा कपूर-टायगर श्रॉफ
‘बागी’ या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा किसिंग सीन जबरदस्त होता. पावसाच्या लोकेशनमध्ये शूट करण्यात आलेला हा सीन चित्रपटाला हॉटनेसचा तडका लावणारा ठरला. टायगर आणि श्रद्धाची ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली. या सीनमध्ये दोघेही हॉट अ‍ॅण्ड सेक्सी दिसत होते.



नर्गिस फाखरी - इमरान हाशमी
सिरीयल किसर अशी बिरूदावली मिळालेला इमरान हाशमी याचा ‘अजहर’ या चित्रपटातील नर्गिस फाखरी आणि प्राची देसाई यांच्याबरोबरचा किसिंग सीन्स चांगलाच चर्चेत राहिला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकमध्ये त्याची बोल्ड इमेज दाखविण्यात इमरान यशस्वी ठरला. 
 


पूजा हेगडे - हृतिक रोशन
‘मोहजोंदडो’ हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला असला तरी, पूजा हेगडे आणि हृतिक रोशनची केमिस्ट्री चित्रपट समीक्षकांसाठी कौतुकास्पद ठरली. पूजा हेगडेचा हॉट अ‍ॅण्ड सीजलिग लूक बघण्यासारखा होता. दोघांचा किसिंग सीन्सही चांगलाच चर्चेत राहिला. 



कॅटरिना कैफ - सिद्धार्थ मल्होत्रा
‘बार बार देखो’ या चित्रपटात कॅटरिना आणि सिद्धार्थ या जोडीचे समीक्षकांनी चांगलेच कौतुक केले. चित्रपटातील कॅटरिनाचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला. दोघांचा किसिंग सीन बघण्यासारखा होता. या चित्रपटानंतर दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. 



इरिका - अजय देवगण
अजय देवगण याने आॅनस्क्रिन लिप लॉक सीन्स खूपच कमी वेळा दिले आहेत. त्याच्या ‘शिवाय’ या चित्रपटात तो इरिकाला किस करताना बघावयास मिळाला. इरिकाचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट होता. दोघांचा किसिंग सीन चर्चेत राहिला. 



वाणी कपूर - रणवीर सिंग
यशराज बॅनरचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट कथेपेक्षा किस सीन्समुळेच अधिक चर्चेत राहिला. चित्रपटातील एका ३ मिनिटे १६ सेकंदांच्या गाण्यात तब्बल २५ किस सीन दाखविण्यात आले आहेत. रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांनी दिलेले लिप लॉक सीन्स प्रेक्षकांनाही भावले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सेन्सार बोर्डाच्या कचाट्यातून या गाण्याची सुटका करण्यात निर्माते यशस्वी ठरले आहेत. कारण याच वर्षी रिलिज झालेल्या रणदीप हुड्डा याच्या ‘दो लफ्जो की कहानी’ चित्रपटातील किसिंग सीनच्या टायमिंगवर सेन्सारने आक्षेप घेत सर्व किसिंग सीन १८ ते ९ सेकंदाचे असावेत, असा आदेश देत किसिंग सीनला कात्री लावली होती. मात्र ‘बेफिक्रे’च्या निर्मात्यांनी अतिशय चलाखीने या टायमिंगचे तंतोतंत पालन करीत सर्व सीन ९ सेकंदाचेच दाखविले आहेत. त्यामुळे सेन्सारला या गाण्याला हिरवा झेंडा दाखवावा लागला. यापूर्वीदेखील बºयाचशा चित्रपटातील ‘किस सीन’मुळे कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली आहे.  



सना खान - गुरुमित चौधरी
‘वजह तुम हो’ या चित्रपटात सना खान आणि गुरुमित चौधरी यांनी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या. दोघांचे बोल्ड सीन्स खूपच चर्चेत राहिले. कारण चित्रपटातील स्टोरीपेक्षा सनाचा बोल्ड अवतारच प्रेक्षकांच्या अधिक स्मरणात राहिला.  

...आणखी काही रेकॉर्डब्रेक किसिंग सीन्स



‘राजा हिंदुस्तानी’चे रेकॉर्ड
धर्मेश दर्शन यांचा सुपरहिट ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट गाण्यांमुळे जेवढा स्मरणात आहे, तेवढाच केवळ एका किसिंग सीनमुळे आठवणीत आहे. मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि करिष्मा कपूर यांच्यात शूट करण्यात आलेला आतापर्यंत सर्वात लांब किसिंग सीन या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. हा सीन शूट करण्यासाठी आमिरने तब्बल 21 वेळा रिटेक्स घेतला होता. त्यावेळेस या सीनमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. 



‘टू स्टेट्स’चा रिटेक
चेतन भगत याच्या बहुचर्चित कादंबरीवर आधारित असलेल्या ‘टू स्टेट्स’ या चित्रपटातील आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर यांच्यातील किसिंग सीन चांगलाच गाजला. या सीनचे वैशिष्ट्य म्हणजे आलिया भट्ट हिने तब्बल 6 वेळा रिटेक्स घेत हा सीन पूर्ण केला. त्यामुळे ती काही काळ टीकेची धनी ठरली होती. अखेर भट्ट कुटुंबाकडून, आलिया समजूतदार असून, निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट करीत या प्रकरणावर पडदा टाकला. 



सीरियल किसरचा विक्रम
सीरियल किसर म्हणून इमेज असलेल्या इमरान हाशमी याच्या नावे किसिंग सीनचे रेकॉर्ड नसेल तरच नवल. आपल्या प्रत्येक चित्रपटात कंप्लसरी किसिंग सीन देणाºया इमरानने ‘राज-3’ या चित्रपटात सर्वांत लांब किसिंग सीन देऊन रेकॉर्ड केला. चित्रपटात बिपाशा बसू आणि ईशा गुप्ता या दोन्ही अभिनेत्रींसोबत इमरान रोमान्स करताना दिसला. मात्र ईशा गुप्तासोबत त्याने तब्बल 20 मिनिटे किसिंग सीन देऊन एकच खळबळ उडवून दिली. अखेर सेन्सारने या सीनला कात्री लावत त्याची वेळमर्यादा कमी केली. 



‘रामलीला’मधील रोमांस सुपरहिट 
संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या सुपरहिट चित्रपटातील संवाद आणि किस सीनमुळे कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली होती. केवळ तरुणांना आकर्षित करण्यासाठीच अशाप्रकारचे सीन चित्रपटात दाखविण्यात आल्याचा आरोपही भन्साळी यांच्यावर करण्यात आला होता. वास्तविक चित्रपटाची कथा ही जुनीच होती. दोन कुटुंबातील वाद यामध्ये दाखविण्यात आला होता. परंतु गाणे आणि रणबीर-दीपिकाचा रोमांस प्रेक्षकांना खूपच भावला. हेच चित्रपटाच्या यशाचे गमक ठरले. 



शुद्ध देसी रोमान्स
‘मर्डर’ या चित्रपटात इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत यांनी तब्बल 17 किस सीन देऊनखळबळ उडवून दिली होती. खरं तर त्यावेळेस हा बॉलिवूडपटातील किस सीनचा एक रेकॉर्डच होता. मात्र यशराज बॅनरच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटात सुशांत शर्मा आणि परिणिती चोपडा यांनी तब्बल 27 किसिंग सीन देऊन नवा रेकॉर्ड केला होता. त्यामुळे या चित्रपटाला टीकेचा सामना करावा लागला. सेन्सारने चित्रपटातील किसिंग सीनला कात्री लावावी, असा सूरही त्यावेळेस आळवला गेला.



किंग खानने तोडला रूल
एकाही चित्रपटात लिप लॉक सीन देणार नाही, असे सांगणाºया किंग खान अर्थात शाहरूखनेदेखील रूल तोडत लिप लॉक सीन देऊन चर्चा निर्माण केली होती. २०१२ मध्ये आलेल्या ‘जब तक है जान’ या चित्रपटात त्याने कॅटरिनासोबत रोमान्स करताना हा सीन दिला. ज्यावेळेस त्याला याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्याने स्क्रिप्टच्या डिमांडनुसार आणि यश चोपड यांच्या आग्रहास्तव हा सीन देण्यास राजी झाल्याचे सांगितले होते. चित्रपटामधील दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. 

Web Title: ... These actresses hit the 'Kiss' tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.